Koregaon Park Police Station | पुण्यातील उच्चभ्रू परिसर कोरेगाव पार्कमध्ये नेमकं चाललंय काय? भलतेच उद्योग !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील उच्चभ्रू परिसरात म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव पार्क परिसरात (Koregaon Park Police Station) अलिकडील काळात नेमकं काय चाललंय असाच काहीसा प्रश्न निर्माण झाला आहे. जागतिक पातळीवर पुण्यातील हाय-फाय परिसरात म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव परिसरात अलिकडील काळामध्ये स्पा सेंटर (Spa Centers In Pune) आणि मसाज पार्लरचं (Massage Parlour In Pune) पेव फुटलं असल्याचं पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा (SS Cell Pune) विभागानं केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. स्थानिक पोलिसांचा (Koregaon Park Police Station) वरदाहस्त असल्यामुळेच कोरेगाव पार्क परिसरात सध्या अशा प्रकारे भलतेच ‘उद्योग’ सुरू असल्याचं देखील समोर आलं आहे. दरम्यान, दि. 13 मे 2023 रोजी कोरेगाव पार्क परिसरातील एका स्पा सेंटरवर छापा टाकून तेथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (Samajik Suraksha Vibhag Pune) पर्दाफाश केला आहे.

 

पोलिसांनी स्पा सेंटरमधून 3 परदेशी युवतींसह 2 भारतीय अशा एकुण 5 जणींची सुटका केली आहे. काही दिवसांपुर्वीच म्हणजेच दि. 18 मार्च 2023 रोजी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोरेगाव पार्क परिसरातील एका स्पा सेंटरवर छापा टाकून 4 परेदशी, 3 भारतीय अशा एकुण 7 मुलींची सुटका केली होती. गुन्हे शाखेच्या कारवाईला काही दिवस उलटले असतानाच दुसर्‍या एका स्पा सेंटरमध्ये भलतेच ‘उद्योग’ सुरू असल्याची माहिती समोर आल्याने अशा प्रकारच्या उद्योगांना स्थानिक पोलिसांचा वरदाहस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, हेल्थ लॅड क्लिनीक, थाई स्पा व हेल्थ स्पॉट क्लिनीक, थाई स्पा, कोरेगाव पार्क येथे मसाजच्या नावाखाली मुलींकडून वेश्याव्यवसाय (Prostitution Racket In KP Pune) करून घेतला जात असल्याची गोपीनिय माहिती गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये डिकॉय कस्टमर (Decoy Customer) पाठविला. त्याच्याकरिवी स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या (Senior Police Officers In Pune) मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने स्पा सेंटरवर छापा टाकला. तेथे 3 परदेशी आणि 2 भारतीय अशा एकुण 5 मुलींची सुटका करण्यात आली. त्यांना संरक्षणकामी रेस्क्यु फाऊंडेशनमध्ये (Rescue Foundation) ठेवण्यात आले आहे. (Koregaon Park Police Station)

 

पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्यासह दोघांविरूध्द कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये
(KP Police Station Pune) गुन्हा दाखल First Information Report (FIR) करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींस पुढील कारवाई करिता कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव (Sr. PI Bharat Jadhav),
सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote), सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil),
महिला पोलिस अंमलदार मनिषा पुकाळे , रेश्मा कंक, पोलिस अंमलदार अजय राणे, सागर केकाण, अमेय रसाळ,
किशोर भुजबळ आणि ओंकार कुंभार यांच्या पथकाने केली आहे.

 

गेल्या 2 महिन्यांमध्ये कोरेगाव पार्क परिसरात अशा प्रकारच्या स्पा सेंटरवर छापा टाकून एकुण 12
पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. त्यामध्ये 7 परदेशी मुलींचा समावेश आहे. दि. 18 मार्च रोजी कारवाई झाली होती.
त्यामध्ये 7 जणींची सुटका करण्यात आली होती.
त्या घटनेला 2 महिने देखील पुर्ण झाले नाहीत तोवर दुसर्‍या एका स्पा सेंटरमध्ये अशा प्रकारचे भलतेच उद्योग सुरू
असल्याचे समोर आल्याने स्थानिक पोलिसांच्या वरदाहस्तानेच हे सुरू आहे की काय असाच प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Web Title :- Koregaon Park Police Station | What is really going on in Koregaon Park Police Station
Limits, the elite area of ​​Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics News | ‘घरात बसून स्वप्न बघितल्यावर…’, राज ठाकरेंच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर