Pune Crime News | 26 वर्षीय तरूणीचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला आढळल्याने प्रचंड खळबळ

MPSC च्या परिक्षेत केली होती चमकदार कामिगरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या (MPSC Exam) माध्यमातून राज्यात तिसर्‍या क्रमांक पटकावलेल्या 26 वर्षीय तरूणीचा मृतदेह वेल्हे पोलिस स्टेशनच्या (Velhe Police Station) हद्दीतील राजगड किल्ल्याच्या (Rajgad Fort) पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे (Female Dead Body Found Near Rajgad Fort). ही घटना आज (रविवार) दुपारी उघडकीस आली आहे. (Pune Crime News)

 

दर्शना दत्ता पवार Darshana Datta Pawar (26, रा. संजीवनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कॉलनी, रूम नं. 7, बँक कॉलनी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिस स्टेशनमध्ये अकस्मिक मृत्यूची Accidental Death (AD) नोंद करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही वर्षापासून दर्शना एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करत होती. तिने पुण्यात क्लास देखील लावले होते. त्यानंतर तिने गावाकडे जाऊन सेल्फट स्टडी देखील केली. परीक्षेत ती फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यतून तिसरी आली. पुण्यातील एका अकादमीने तिचा सत्कार ठेवला होता. त्या समारंभासाठी ती पुण्यात दि. 9 जून रोजी आली होती.

 

नर्‍हे परिसरात ती तिच्या मैत्रिणीकडे रहावयास होती. दि. 12 जून रोजी ती मैत्रिणीला सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जात असल्याचे सांगुन निघाली. त्याबाबत तिने घरच्यांना देखील सांगितले होते. मात्र, त्यानंतर तिचा फोन बंद झाला. दरम्यान, दि. 15 जून रोजी पवार कुटुंबियांनी ती हरविल्याची तक्रार सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये (Sinhagad Road Police Station) दिली होती.

मिसिंगची तक्रार दाखल झाल्यानंतर देखील तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला.
दरम्यान, आज (रविवार) वेल्हे पोलिस स्टेशनच्या पायथ्याला झाडांमध्ये एका तरूणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळॅन आला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मोबईल आणि इतर काही वस्तू आढळून आल्या.
पोलिसांनी दर्शनाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. दर्शनाचे वडिल दत्ता पवार हे एकासोबत घटनास्थळी गेले.
त्यांना तिची ओळख पटली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस (Pune Rural Police)
आणि पुणे शहर पोलिस (सिंहगड रोड) Pune City Police अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | 26 Years Old Girl Darshana Datta Pawar Dead Body Found Near Rajgad Fort
Velha Police Station Pune Rural Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा