Pune Crime News | बनावट कागदपत्रांच्या आधारे सारस्वत बँकेची 27 लाखांची फसवणूक, बिल्डरसह चार जणांविरुद्ध FIR, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बनावट कागदपत्र (Forged Documents) तयार करुन ही कागदपत्रे खरी आहेत असे सारस्वत को-ऑप बँकेच्या औंध शाखेतील (Saraswat Co-op Bank, Aundh Branch) अधिकाऱ्यांना सांगून 4 जणांनी एकूण 27 लाख 35 हजार रुपयांचे गृह कर्ज मंजूर (Loan Approved) करुन घेऊन बँकेची फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News)

बांधकाम व्यवसायिक शांताई कन्सट्रक्शनचे (Shantai Construction) अनिल पांडुरंग साळुंखे Builder Anil Pandurang Salunkhe (रा. टिंगरे नगर, पुणे), अश्विन जगन्नाथ गायकवाड Ashwin Jagannath Gaikwad (वय-39 रा. पिंपळे गुरव), प्रतिक वैद्य Pratik Vaidya (रा. पिंपळे गुरव), सदानंद माने Sadananda Mane (रा. निगडी) यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) आयपीसी 426, 420, 465, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अश्विन जगन्नाथ गायकवाड याला अटक केली आहे. याबाबत सारस्वत को-ऑप बँक शाखा औंध शाखाव्यवस्थापक किर्ती निलेश शिर्के Branch Manager Kirti Nilesh Shirke (वय-42 रा. पाषाण-सुस रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अश्विन गायकवाड यांची धानोरी येथे सर्वे नं. 36 हिस्सा नं 2/3/1 मिळकत आहे.
या मिळकतीवर यापूर्वी बेकायदेशीर पणे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India (SBI),
परिमल कॅपिटल अँड हौसिंग फायनान्स (Parimal Capital and Housing Finance)
आणि होम फर्स्ट फायनास कंपनी लि. (Home First Finance Company Ltd.)
यांच्याकडून कर्ज घेतले आहे. या मिळकतीवर तीन बँकांचा बोजा असताना आरोपींनी संगनमत करुन
या मिळकतीचे बनावट कागदपत्र तयार केली. कागदपत्र खरी असल्याचे भासवून आरोपींनी
वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेतले. तसेच बनावट कागदपत्र खरी असल्याचे सांगून सारस्वत बँकेच्या औंध शाखेतून 27 लाख 35 हजार रुपयांचे कर्ज मंजुर करुन घेतले.

आरोपींनी बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करुन ती बँकेत सादर करुन त्यावर कर्ज घेऊन बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला होता. या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक झरेकर (API Zarekar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sakshi Chopra | बिग बॉस 17 मध्ये येणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा; आपल्या रिव्हिलिंग फॅशनसाठी जाते नावाजली