Pune Crime News | उधारीवर माल देणे पडले महागात, 48 लाखांची फसवणूक; मार्केटयार्ड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | होलसेल दुकानातून उधारीवर माल घेऊन पैसे न देता दोघांनी एका व्यापाऱ्याची तब्बल 47 लाख 87 हजार 525 रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्री बालाजी ट्रेडिंग कंपनीच्या (Shree Balaji Trading Company) मालकांविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Pune Police) वेगवेगळे फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार जुन 2019 ते सन 2020 व जुलै 2020 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत मार्केटयार्ड गुलटेकडी येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत अभय बनसीलाल संचेती (वय-63 रा. पारसनिस कॉलनी, मार्केटयार्ड पुणे) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) रविवारी (दि.12) फिर्याद दिली आहे. त्यानुसार उत्सव हॉटेल चौकातील श्री बालाजी ट्रेडिंग कंपनीचा मालक पोकरराम मेवाराम चौधरी Pokarram Mevaram Chaudhary (रा. राजस्थान) व रहाटणी गावठाण व काळेवाडी येथील हनुमान किरताराम चौधरी (रा. राजस्थान) यांच्यावर आयपीसी 419, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी अभय संचेती यांचे बनसीलाल लखीचंद संचेती जनरल मर्चंट अँड कमिशन एजंट (Bansilal Lakhichand Sancheti General Merchant & Commission Agent) व पनालाल बनसीलाल या नावाने मार्केटयार्ड येथे अन्नधान्य व डाळी विक्रीचे होलसेलचे दुकान आहे. श्री बालाजी ट्रेडिंग कंपनीचा मालक पोकरराम चौधरी याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन दोन्ही फर्म मधून 31 लाख 57 हजार 723 रुपयांचा माल उधारीवर खरेदी केला. (Pune Crime News)

तसेच रहाटणी गावठाण व काळेवाडी येथील श्री बालाजी ट्रेडिंग कंपनीचा मालक हनुमान चौधरी
याने जुलै 2020 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत
फिर्यादी अभय संचेती यांच्या दोन्ही दुकानातून 16 लाख 29 हजार 802 रुपयांचा माल उधारीवर खरेदी केला.
मात्र आरोपींनी फिसवणूक करण्याच्या उद्देशाने माल खरेदी केल्यानंतर मालाचे पैसे न देता निघून गेले.
फिर्यादी यांनी आरोपींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता.
या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शिंदे (PI Shinde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फटाके फोडण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, सुरक्षा रक्षकाला अटक; कल्याणीनगर मधील घटना