Pune Crime News | कोल्हापूर येथून आलेल्या एकाला लुटणार्‍या 5 जणांना अटक

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोल्हापूर (Kolhapur) येथून आलेल्या एका प्रवाशाला रिक्षा प्रवासी म्हणून घेत सराईत गुन्हेगारांनी त्याला वेगवेगळ्या नेत मारहाण करत लुटल्याचा (Pune Crime News) प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी 5 जणांना अटक (Arrest) केली आहे. तर एकजण पसार झाला आहे. बंडगार्डन परिसरात ही घटना घडली आहे. Pune Crime News | 5 arrested for robbing one from Kolhapur

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी सागर उर्फ पार्थ ज्ञानेश्वर भांडे (वय 28), शाहबाज उर्फ डी. शरीफ नदाफ (वय 22), मोहरम उर्फ सम्या शमी शेख (वय 27), राजेश मंगल मंडल (वय 24) व इमाम जलालद्दीन सैय्यद (वय 24) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.
याबाबत विजय गुरव (वय 29, रा. वाघोली) यांनी बंडगार्डन पोलीस (Bundgarden Police) ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मूळचे कोल्हापूर येथील आहेत.
ते वाघोली परिसरात नोकरी करतात. ते कामानिमित्त मूळगावी गेले होते.
ते कोल्हापूर येथून बसने बुधवारी पहाटे पुण्यात आले. ते मालधक्का चौकात साडे चार वाजण्याच्या सुमारास उतरले. त्यांनी वाघोली येथे जाण्यासाठी रिक्षा पाहिली.
यावेळी त्यांना एका आरोपीने वाघोली येथे नेण्यासाठी म्हणून रिक्षात बसवले.
मात्र आरोपीने त्यांना वाघोली येथे घेऊन न जाता कै. तुकाराम शेठ शिंदे वाहनतळ येथे नेले.
त्यांना रिक्षात बसल्यानंतर या आरोपीने मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर इतर आरोपीही येथे आले. यानंतर त्यांना परत मालधक्का चौक ते नरपतगिरी चौकादरम्यान फिरवत त्यांना मारहाण केली. यानंतर त्यांना रिक्षातून खाली उतरवत या 6 जणांनी बेदम मारहाण केली.
त्यानंतर त्यांच्याजवळ असलेली बॅग, रोकड आणि इतर ऐवज चोरुन नेला.
आरोपी त्यांना तेथेच सोडून गेल्यानंतर फिर्यादी यांनी बंडगार्डन पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन यातील 5 जणांना अटक केली आहे.
यात आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

Web Title : Pune Crime News | 5 arrested for robbing one from Kolhapur

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला भरदिवसा लुटणार्‍या 5 जणांवर ‘मोक्का’; आयुक्त अमिताभ गुप्तांकडून 37 वी कारवाई