Pune Crime News | एरंडवण्यात प्लॉट देण्याच्या नावाखाली 5 कोटींची फसवणूक; महेंद्र शहा, महेंद्र भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | एरंडवण्यात (Erandwane) 750 चौ. मीटरचा प्लॉट नावावर करुन देण्याचे आमिष दाखवून तिघा ज्येष्ठांची तब्बल 5 कोटी 19 लाख रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत कैलास सखाराम जाधव (वय 60, रा. एकाक्ष सोसायटी, मॉडेल कॉलनी) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 150/23) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्लॉटधारक महेंद्र शहा, महेंद्र भंडारी व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 28 जानेवारी 2015 पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी महेंद्र शहा व महेंद्र भंडारी यांनी एरंडवणा येथील
सुनिता सोसायटीमधील प्लॉट मुळ मालक अत्रे यांच्याकडून खरेदी केला होता. फिर्यादी व त्यांच्या दोघा सहकार्‍यांना त्यांनी
हा 750 चौ़ मीटरचा प्लॉट नं. 1 नावावर करुन देतो, असे सांगितले. त्यांच्याकडून 5 कोटी 19 लाख रुपये 2015 मध्ये घेतले.
त्यानंतर वेळोवेळी त्यांनी प्लॉट नावावर करुन देण्यास टाळाटाळ केली.
फिर्यादी यांनी प्रत्यक्ष कागदपत्रे पाहिल्यावर त्यांना 8 गुंठे जागा सांगितली असताना प्रत्यक्षात ती जागा 7 गुंठे
असल्याचे लक्षात आले. त्यांनी पैसे परत मागितल्यावर ते परत न केल्याने फसवणुक (Fraud Case) झाल्याचे
लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior PI Shrihari Bahirat) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

22 September Rashifal : मेष, कन्या आणि मकरसह दोन राशींना मिळेल खुशखबर, वाचा दैनिक भविष्य

Sarathi Ganesh Utsav Guide 2023 | पुणे पोलिसांच्या ‘सारथी गणेश उत्सव गाईड 2023’ लिंकचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण