Pune Crime News | 74 वर्षाच्या पत्नीने 78 वर्षाच्या पतीविरुद्ध केली फसवणुकीची तक्रार; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime News | पटत नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून ते वेगळे राहू लागले. या दरम्यान, पतीने आपली बनावट सही करुन फसवणूक (Cheating Case) केल्याची ७४ वर्षाच्या महिलेने आपल्या ७८ वर्षाच्या पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पाषाण येथील पंचवटीमध्ये राहणार्‍या एका ७४ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवाजीनगर येथील एका बंगल्याच्या आऊट हाऊसमध्ये राहणार्‍या ७८ वर्षाच्या ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. फसवणुकीचा हा प्रकार १२ फेब्रुवारी २०२३ पूर्वी घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघे पतीपत्नी आहेत.
फिर्यादी व त्यांचा मुलगा हे सध्या एकत्र राहत आहेत.
तर गेल्या काही महिन्यांपासून फिर्यादीचा पती एका बंगल्यातील आऊट हाऊसमध्ये रहात आहे. जंगली महाराज रोडवरील एका इमारतीतील एक दुकान फिर्यादी व तिचे पती त्यांच्या नावावर आहे. फिर्यादी व त्यांचा मुलगा आपले काही ऐकत नाही, या कारणावरुन त्यांच्या पतीने दुकानातील दोन प्लॉटर, चार संगणक व इतर वस्तू पार्किंगमध्ये काढून ठेवल्या. फिर्यादीची १० हजार रुपयांची रक्कम चोरली. फिर्यादीचे दुकानाचा फेअर अँड फास्ट नावाचा बोर्ड काढून टाकला. तसेच फिर्यादीची बनावट सही करुन आर्टिकल ऑफ अ‍ॅग्रीमेंटवरील फिर्यादीचे नाव खोडून फिर्यादीची फसवणूक (Fraud Case) केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक नाईक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | 74-year-old wife files cheating complaint against 78-year-old husband; FIR in Shivajinagar Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Weather News | पुण्यात पुन्हा वाढला गारठा; किमान तापमान गेले सिंगल डिजिटमध्ये, आल्हाददायक वातावरणाचा अनुभव

Nagpur Crime News | पाण्याच्या टाकीत पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू