Pune Crime News | डॉक्टर पतीविरुद्ध डॉक्टर पत्नीकडून कोटयावधी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दवाखान्यातील कागदपत्रांवर पत्नीच्या खोट्या सह्या करून रकमेचा अपहार (Cheating Case) करत पाहुणचाराच्या नावाखाली करोडो रुपये आणि सोने – चांदी घेत पत्नीच्या रकमेचा अपहार करून तिला बाहेर काढण्याच्या धमकी देणाऱ्या पती डॉ. अमित कस्तुरीलाल लुथरा Dr. Amit Kasturilal Luthra (रा. ए/203, मारवल प्लाझा, एअरपोर्ट रोड, विमाननगर, पुणे) विरूद्ध त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार विमानतळ पोलीस स्टेशन (Viman Nagar Police Station) येथे भा. द. वि. कलम ४२०, ४०६, ४६५, ४९८-अ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पतीस मदत करणारा त्याचा भाऊ राजीव कस्तुरीलाल लुथरा Rajeev Kasturilal Luthra (रा. ए/203, मारवल प्लाझा, एअरपोर्ट रोड, विमाननगर, पुणे) यास देखील सदर गुन्ह्यात सह-आरोपी करण्यात आले आहे. (Pune Crime News)

सदर प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी व डॉ. अमित यांचा २० मे २०११ रोजी विवाह झाला होता.
सदर विवाहामध्ये पत्नीकडून होंडा सिटी कार, १० तोळे वजनाचे एक बिस्किट असे एकूण १५ सोन्याचे बिस्किट, ०२ किलो चांदीचे भांडे, ०५ तोळे सोन्याची चैन व हिऱ्याची अंगठी देऊन एक करोड रुपये रकमेच्या वस्तुंची मागणी करत त्या स्वीकारून पतीने सदर विवाह केला होता. तसेच नवीन व्यवसायासाठी पत्नीचे माहेरून ५० लाख रुपये मागून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर व्यवसायासाठी मागितलेल्या पैशांचा हिशोब मागितल्यावर पतीने पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला घरातून निघून जाण्यास सांगितले. तसेच, सोबत सुरू केलेल्या लाईफ बेरीज हेल्थ प्रा. लि. कंपनीचे (Lifeberries Health Pvt Ltd Pune) दवाखान्यातील पत्नीच्या रक्कमांचा अपहार करून तिच्या बनावट सह्या करून पतीने तिची फसवणूक (Fraud Case) केल्याची फिर्याद डॉ. अमित लुथरा यांच्या पत्नीने दाखल केली आहे. ॲड. विजयसिंह ठोंबरे (Adv Vijaysinh Thombare) व ॲड. रुपाली पाटील ठोंबरे (Adv. Rupali Patil Thombare) हे पीडित पत्नीतर्फे कायदेशीर काम बघत आहे. (Pune Crime News)

सदरील वाद हा केवळ कौटुंबिक वाद नसून सदर पतीने पत्नीच्या बनावट सह्या करून त्यांनी सोबत सुरू केलेल्या व्यवसायातील रक्कमेचा
अपहार केला असल्याने सदर बाब अत्यंत गंभीर असल्याचे मत अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी मांडले.

Web Title :Pune Crime News | A case has been registered against the doctor husband for defrauding the doctor wife of crores of rupees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा