Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कोंढव्यातील व्यक्तीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोंढवा येथे आईसोबत भाजी आणण्यासाठी गेलेल्या एका 12 वर्षाच्या मुलीसोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध कोंढवा पोलिसांनी (Pune Police) पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. तर जतिन भगवान पाटील Jatin Bhagwan Patil (रा. साळुंखे विहार सोसायटी, कोंढवा) याच्यावर आयपीसी 354, 354ड, पोक्सो कायदा कलम 8,12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.3) एबीसी फॉर्म चौक कोंढवा येथे घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी या त्यांच्या 12 वर्षाच्या मुलीला घेऊन भाजी खरेदी करण्यासाठी कोंढवा येथील एबीसी फॉर्म चौकात गेल्या होत्या. फिर्यादी भाजी खरेदी करत असताना त्यांची अल्पवयीन मुलगी गाडीवर बसली होती. त्यावेळी आरोपी जतिन पाटील हा त्या ठिकाणी आला. त्याने फिर्य़ादी यांच्या मुलीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला.
मुलगी रडायला लागल्याने फिर्य़ादी यांनी मुलीकडे चौकशी केली. त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला.
फिर्य़ादी यांनी तात्काळ कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग, खडकी मधील प्रकार

अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कोथरुडमधील घटना