Pune Crime News | दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी डेक्कन पोलिसांकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | घातक शस्त्र बाळगून दरोड्याच्या तयारीत (Preparation for Robbery) असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला डेक्कन पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही कारवाई (Pune Crime News) सोमवारी (दि.21) रात्री लॉ कॉलेज रस्त्यावरील (Law College Road Pune) एका बिल्डींगच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत केली.

जसपालसिंग जपानसिंग जुन्नी (वय-20, रा.भारत नगर, पिंपरी चिंचवड), कुलदीपसिंग युवराजसिंग जुन्नी (वय-20, पाटील इस्टेट, शिवाजीनगर), नसीबसिंग रणजितसिंग दुधानी (वय-18, न्यू बुधवार पेठ, सोलापूर), प्रसादसिंग जलसिंग भोंड (वय-19 रा. भरतनगर, पिंपरी चिंचवड), गौरव शंकर राठोड (वय-19, गोल्डन चौक, चाकण) यांना अटक (Arrest) केली आहे. तर अरुणसिंग चंदाशिंग भोंड (रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) हा पळून गेला आहे.

डेक्कन पोलीस ठाण्यातील (Deccan Police Station) तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्री हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले (PSI Mahesh Bhosale) यांना माहिती मिळाली की, लॉ कॉलेज रस्त्यावरील एका बिल्डिंगच्या शेजारी मोकळ्या जागेत 5 ते 6 जण लोखंडी कोयते व चारचाकी टेम्पे घेऊन एकत्र जमले असून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याठिकाणी बसलेल्यांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी तीन जणांनी अटक टाळण्यासाठी ब्लेडने स्वत:च्या पोटावर, हातावर केले. पोलिसांनी प्रसंगावधान ओळखून त्यांच्या हातातून ब्लेड काढून घेतली. परिसरात पाहणी केली असता एक चार चाकी टेम्पो (एमएच 14 एचयु 4968) उभा असल्याचे आढळून आले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत ते डेक्कन येथील इंडसइंड बँकेवर (IndusInd Bank) दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून कोयते, दोरी, ब्लेड, लोखंडी कटावणी, टेम्प जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत (PSI Dattatraya Sawant) करत आहेत.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill),
सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर (ACP Vasant Kuwar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस (Senior PI Vipin Hasbanis)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत, पोलीस अंमलदार चव्हाण, शिंदे,
निकाळजे, बोरसे, महिला पोलीस अंमलदार सुपेकर, गायकवाड, येळे, गोफणे, भांगले, तरंगे, तांबे, गायकवाड,
बागुले, बडगे, पाथरुट, काळे, जाधव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Power of Investing | लवकर करोडपती बनायचंय?, गुंतवणुकीच्या या तीन सवयी फॉलो केल्याने पूर्ण होईल स्वप्न