Pune Crime News | नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून मोबाइल चोरणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे-बेंगलोर हायवेवर (Pune Bengaluru Expressway) रात्रीच्या वेळी एकटे जाणाऱ्या लोकांना चाकुचा धाक (Robbery In Pune) दाखवून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या टोळीतील 5 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट चारच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जुना पुणे-मुंबई हायवेवरील (Old Mumbai Pune Highway) बोपोडी मेट्रो स्टेशन (Bopodi Metro Station) जवळ केली आहे. (Pune Crime News)

किशोर उत्तम गायकवाड Kishor Uttam Gaikwad (वय-19 रा. कमलाबाई बहीरट चाळ, बोपोडी), अजय उर्फ ओमकार सुरेश गाडेकर Ajay Alias Omkar Gadekar (वय-21 रा. बोपोडी), आषिश उर्फ बोना संतोष सोजवळ Ashish Alias Bona Santosh Sojaval (वय-24 रा. सावंत नगरीजवळ, बोपोडी), जॉर्ज डॉम्निक डिसोजा George Dominique D’Souza (वय-19 रा. पवळे चाळ, बोपोडी) साहिल उर्फ साहील्या सलीम शेख Sahil Alias Sahilya Salim Shaikh (वय-19 रा. इंदीरानगर वसाहत, खडकी बजार, खडकी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News)

गणेशोत्सवाच्या (Pune Ganeshotsav 2023) पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट -4 चे पथक प्रतिबंधक पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार अजय गायकवाड व सारस साळवी यांना माहिती मिळाली की, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी मेट्रो स्टेशन येथील साईबाबा मंदिराजवळ तीन जण चोरीचे मोबाईल कमी किंमतीत विकत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा कारवाई करुन किशोर गायकवाड, ओमकार गाडेकर व आशिष सोजवळ या तिघांना ताब्यात घेतले.

आरोपींकडे असलेल्या स्कुटरची झडती घेतली असता डिकीमध्ये वेग-वेगळ्या कंपनीचे 12 मोबाईल व एक चाकु मिळाला. आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड भागात तसेच पुणे-बेंगलोर हायवेवर रात्रीच्या वेळी एकटे जाणाऱ्या लोकांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाइल जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याचे सांगितले. तसेच त्यांचे इतर दोन साथीदार जॉर्ज डिसोजा व साहील शेख हे बोपोडी येथील हॅरिस ब्रिज जवळ थांबले असून त्यांच्याकडे देखील चोरीचे मोबाईल आहेत.

पोलिसांच्या पथकाने हॅरिस ब्रिज जवळून दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे 8 मोबाईल मिळाले. या कारवाईत आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, 20 मोबाईल, चाकू असा एकूण 4 लाख 15 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून खडकी (Khadki Police Station), सांगवी (Sangvi Police Station), चतु:श्रृंगी (Chaturshringi Police Station), स्वारगेट (Swargate Police Station), सिंहगड रोड (Sinhagad Road Police Station), हिंजवडी (Hinjewadi Police Station), भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) दाखल असलेले 11 मोबाईल जबरी चोरीचे व एक घरफोडी असे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 2 सतीश गोवेकर (ACP Satish Govekar),
पोलीस निरीक्षक गणेश माने (Sr PI Ganesh Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव (API Vikas Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaydeep Patil), महेंद्र पवार (PSI Mahendra Pawar) पोलीस
अंमलदार अजय गायकवाड, हरीष मोरे, प्रविण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, संजय आढारी, सारस साळवी,
नागेशसिंग कुँवर, विनोद महाजन, स्वप्नील कांबळे, वैभव रणपिसे, मनोज सांगळे, अशोक शेलार,
अमोल वाडकर, रमेश राठोड, महिला पोलीस अंमलदार वैशाली माकडी, चालक शितल शिंदे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | सावधान! आक्षेपार्ह पोस्ट कराल तर खबरदार, पुसेसावळीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची 4 कोटींची फसवणूक करुन मागितली 15 कोटींची खंडणी, चार जणांवर FIR