Pune Crime News | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची 4 कोटींची फसवणूक करुन मागितली 15 कोटींची खंडणी, चार जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाची (Builders In Pune) तब्बल 4 कोटी रुपयांची फसवणूक (Cheating Case) करुन 15 कोटी रुपये खंडणी (Extortion Case) मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 29 डिसेंबर 2013 ते जून 2023 दरम्यान हवेली तालुक्यातील पिसोळी (Pisoli) येथे घडला आहे. (Pune Crime News )

याबाबत बांधकाम व्यावसायिक राहुल प्रेमप्रकाश गोयल Rahul Premprakash Goysl (वय-38 रा. ढोलेपाटील रोड, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कुणाल शंकर मासाळ (Kunal Shankar Masal), अनिता शंकर मासाळ, चैताली शंकर मासाळ, तेजस शंकर मासाळ (Tejas Shankar Masal) (सर्व रा. पिसोळी, ता. हवेली) यांच्या विरोधात आयपीसी 420, 465, 468, 471, 388, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपींच्या मालकीची पिसोळी येथील 1 हेक्टर 35 आर जमीन 29 डिसेंबर 2013 रोजी हवेली येथे दस्त करुन विकसनासाठी घेतली होती. त्यानुसार 19 टक्के रेव्हेन्यू शेअरीग आरोपींना देण्याचे ठरले होते. असे असताना आरोपींनी 19 टक्के रव्हेन्यू शेअरींग ऐवजी 38 टक्के सेलेबल बांधकाम क्षेत्र देण्याची मागणी केली. तसेच फिर्यादी यांना आरोपींच्या हिस्स्यावर 4 कोटी रुपयांचे बांधकाम करण्यास भाग पाडले.

आरोपींनी ठरल्याप्रमाणे चुकीची दुरुस्तीचा दस्त करुन दिला नाही तसेच फिर्यादी यांनी त्यांच्या हिस्स्यामध्ये केलेल्या बांधकामाचा ताबा न घेता चार कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
त्यानंतर आरोपींनी 38 टक्के रेव्हेन्यू शेअरींग किंवा सेलेबल बांधकाम घेण्यास नकार देऊन 15 कोटी रुपयांची खंडणी
मागितली. आरोपींनी एरिया स्टेटमेंट आफ्टर युडीसीपीआर 2020
च्या नियमावलीचा खोटा दोस्त तयार करुन तो खरा असल्याचे भासवून फिर्यादी यांना खोट्या गुन्ह्यात
अडकवण्याची धमकी दिली. याबाबत फिर्यादी राहुल गोयल यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर न्यायालयात याचिका (Pune Lashkar Court) दाखल केली. न्यायालयाच्या आदेशावरुन कोंढवा पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील (PSI Pooja Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात मोबाईलवर चर्चा, रात्री उशीरा मंत्री सामंतांनी घेतली भेट

13 September Rashifal : कन्या, तुळ आणि कुंभ राशीला नोकरीसाठी चांगला दिवस, वाचा दैनिक भविष्य

Yashomati Thakur On Navneet Ravi Rana | ‘औकातीत रहायच, माझ्या बापाने आणि आम्ही…’
नवनीत राणांच्या आरोपांवर यशोमती ठाकूर भडकल्या

शनिवार पेठ: वडिलांना मारल्याने मुलाने साथीदारांच्या मदतीने केला खूनाचा प्रयत्न;
बापाने सोसायटीत जाऊन घातला राडा