Pune Crime News | हॉटेलमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एका हॉटेलमधील वेश्या व्यवसायाचा (Prostitute Business) प्रकार गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell Pune) उघडकीस आणला आहे. या कारवाईत हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून एक महिलेला अटक केली आहे. (Pune Crime News)

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) दोन दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार तुषार नामदेव भिवरकर यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.11) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास विमाननगर चौकातील एका हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत करण्यात आली. (Pune Crime News)

एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील (SS Cell Pune) पोलिस अंमलदार तुषार भिवरकर आणि अमेय रसाळ यांना मिळाली होती. समजली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील रुममध्ये छापा टाकून महिला दलालासह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील दोन तरुणांना ताब्यात घेतले.

आरोपीने हॉटेलमध्ये रूम बुक करुन त्याठिकाणी पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होती. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. या कारवाईत एका महिला एजंटला ताब्यात घेतले आहे. तर एकाचा पोलीस शोध आहेत. पोलिसांनी 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत जाधव (Senior PI Bharat Jadhav),
सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे
(API Aniket Pote), सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळगावे (API Rajesh Malgave),
पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, सागर केकाण, बाबा कर्पे, तुषार भीवरकर, अजय राणे, इरफान पठाण,
अमेय रसाळ, हनुमंत कांबळे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार, संदीप कोळगे, महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, रेश्मा कंक यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap On PSI | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शच्या जाळ्यात

Pune Crime News | कंपनीचा संचालक बोलत असल्याचे सांगून 66 लाखांची फसवणूक,
पुणे सायबर पोलिसांकडून बिहार येथून दोघांना अटक