Pune Crime News | भावाच्या पत्नीला सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात वीट घालून केले जबर जखमी

पुणे : Pune Crime News | भावाच्या पत्नीला काही जण मारहाण (Beating) करीत असल्याचे पाहून तिला सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात वीट मारुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी मनिषा रामदास माने (वय ४०, रा. पड्याळ वस्ती, औंध रोड) यांनी खडकी पोलिसांकडे (Pune Police) फिर्याद (गु. रजि. नं. ६९/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी भारती, प्रज्ञा, ऋषिकेश, बाळु यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार औंध रोडवरील भाऊ पाटील पड्याळ वस्ती येथे १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाची पत्नी कोमल व आरोपी यांच्यात पूर्वी वाद झाले
होते. या कारणावरुन तिला भारती व प्रज्ञा हे मारहाण करीत होते.
प्रज्ञा हिने तिच्या डोक्यात वीट मारुन जखमी केले. हे पाहून फिर्यादी या तिला सोडविण्याकरीता गेल्या.
तेव्हा प्रज्ञा व भारती यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली.
या वेळी झालेल्या झटापटीतमध्ये त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र व कानातील रिंगा या पडून गहाळ झाल्या.
बाळु याने फिर्यादीच्या डोक्यात वीट मारुन जखमी केले.
ऋषिकेश याने पाठीमागून येऊन फिर्यादी यांचा भाऊ उमेश यांच्या डोक्यात मारुन जखमी केले.
पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | A woman who went to save her brother’s wife was severely injured by hitting a brick on her head

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यावर विधीमंडळातील पक्ष कार्यालयही गेलं, शिंदे गटाने घेतला पक्ष कार्यालयाचा ताबा; ठाकरे गटाच्या आमदारांचे काय?