Pune Crime News | अपहरण, बलात्कार गुन्ह्यातील महिला आरोपीची जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अपहरण (Kidnapping) आणि बलात्कार (Rape) गुन्ह्यातील आरोपी हलिमा नासीर शेखची (Halima Naseer Shaikh) जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता (Acquittal) केली आहे. न्यायालयाचे न्यायाधीश के.के. जहागिरदार (Judge K. K. Jahagirdar) यांनी आदेश काढल्याची माहिती अॅड. प्रशांत सी पवार (Adv. Prashant C Pawar) यांनी दिली. याबाबत (Pune Crime News) 10 मे 2021 रोजी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) आयपीसी 363,376(2)(एन) व 17 यासह पॉक्सो अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी हलिमा शेख हिने पीडित मुलीचे राहत्या घरातून अपहरण केले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने याप्रकरणी न्यायालयात दोषारोप पत्र (Charge Sheet) दाखल करुन खटला चालू करण्याचे आदेश (Pune Crime News) दिले होते. आरोपीच्या वतीने अॅड. प्रशांत पवार यांनी वकिलपत्र दाखल करुन खटला चालवला. या प्रकरणातील सर्व साक्षीदार सरकार पक्षाकडून व बचाव पक्षाकडून तपासण्यात आले.

खटल्यातील सर्व साक्षीदार तपासल्यानंतर अंतिम युक्तिवाद दोन्ही पक्षांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून
न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की, सरकार पक्ष आरोपीला दोषी ठरवण्यात असमर्थ झाले व बचाव पक्षाकडून
अॅड. प्रशांत पवार यांनी योग्य युक्तिवाद केला. आरोपीचे वकील अॅड. पवार यांनी आरोपी विरुद्ध ठोस पुरावे
नसल्याचे कोर्टाला सांगितले व सबळ पुरावे नसल्याने आरोपीची मुक्तता करावी असा युक्तिवाद त्यांनी केला.

अॅड. प्रशांत पवार यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायालयाचे (District and Sessions Court)
न्यायाधीश के.के. जहागिरदार यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात बचाव पक्षाचे अॅड. प्रशांत पवार यांना अॅड. मिथुन चव्हाण (Adv. Mithun Chavan) यांनी योग्य मार्गदर्शन केले.

Web Title :-   Pune Crime News Acquittal of female accused in kidnapping, rape by District and Sessions Court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ratnagiri Refinery Survey | खारघर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळावी, अजित पवारांची सरकारला विनंती

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिरूर पोलिस स्टेशन (पुणे ग्रामीण) – सख्खा भाऊ बनला पक्क वैरी ! 28 वर्षीय वहिनीचा खून तर भावाच्या खुनाचा प्रयत्न

Maharashtra Political News | शरद पवार-प्रकाश आंबेडकर यांची भेट सकारात्मक, वंचितच्या मविआ प्रवेशाला काँग्रेसचा विरोध नाही