Ratnagiri Refinery Survey | खारघर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळावी, अजित पवारांची सरकारला विनंती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ratnagiri Refinery Survey | राजापूर तालुक्यातील्या बारसू सोलगाव (Barsu Solgaon) परिसरात माती परीक्षणासाठी (Soil Testing) प्रस्तावित रिफायनरीसाठी सर्वेक्षण (Ratnagiri Refinery Survey) करण्यात येणार आहे. मात्र या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. जमिनीच्या सर्वेक्षणाविरोधात हजारो ग्रामस्थ बारसूमधील सड्यावर जमले आणि त्यांच्याकडून पोलीस व अधिकाऱ्यांची वाट अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले असून त्यांना रत्नागिरीमध्ये आणण्यात आले आहे. सर्व आंदोलकांना पोलीस मुख्यालयाच्या (Ratnagiri Police Headquarters) बहुउद्देशीय सभागृहात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करुन सरकारला एक विनंती केली आहे.

अजित पवार म्हणाले, बारसू रिफायनरीसाठी (Barsu Refinery) होणारे सर्वेक्षण (Ratnagiri Refinery Survey) तात्काळ स्थगित करुन मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी व त्यावर मार्ग काढावा. पोलीस बळाचा वापर करुन दंडुकेशाहीने सर्वेक्षण करु नका, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करत सरकारला केली आहे.

तसेच रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

1800 पोलीस तैनात

पोलिसांनी रिफायनरी विरोधी संघटनेच्या अध्यक्षांना मुंबईत अटक (Arrest) केली आहे.
तर सर्वेक्षण सुरळीत पार पाडण्यासाठी 1800 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, मंगळवारी सर्वेक्षण करण्यासाठी लागणारे सामान घेऊन गाड्या बारसू परिसरात दाखल झाल्या.
या ठिकाणी आंदोलक महिला रस्त्यावर आडव्या झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पुन्हा वाढवण्यात आला. या सगळ्या घटनांवर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
(SP Dhananjay Kulkarni) स्वत: लक्ष ठेवून आहेत.

Web Title :-  Ratnagiri Refinery Survey | ajit pawar requests the government not to conduct surveys by using police force

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – तरुणीशी शारीरीक संबंध ठेवून गावाकडील मुलीसोबत फोडली सुपारी

Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांकडून तृष्णा शांतीसाठी जिल्हयात 30 ठिकाणी पाणीपोईची सोय ! पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमान नगर पोलिस स्टेशन – मुली बरोबर बोलू नको सांगितल्याने दुचाक्या दिल्या पेटवून