Pune Crime News | कात्रज-आंबेगाव बु. परिसरात दशहत निर्माण करणार्‍या प्रेम शिंदे टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीतील कात्रज (Katraj) आणि आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) परिसरात दहशत निर्माण करणार्‍या प्रेम शिंदे टोळीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का MCOCA (Mokka Action) अंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी आत्तापर्यंत एकुण 27 संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळयांविरूध्द मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. (Pune Crime News)

टोळी प्रमुख प्रेम अंकुश शिंदे Prem Ankush Shinde (23, वेताळनगर, ताटे पार्क सोसायटी शेजारील बिल्डींग, आंबेगाव बु., पुणे. मुळ रा. मु.पो. खरीव, ता. वेल्हा, जि. पुणे), गणेश बाबू ओव्हाळ उर्फ भावडया Ganesh Babu Oval Alias Bhavdaya (24, रा. जय शिवाजी चौक, आंबेगाव बु., पुणे), भिमश्या सुरेश मुडावत / चव्हाण Bhimshya Suresh Mudawat / Chavan (19, रा. अमित ब्लु फिल्ड, सोसायटीच्या जवळ, आंबेगाव बु., पुणे), करण रवि पटेकर Karan Ravi Patekar (20, रा. भुमकर ब्रिज, बालाजी पार्क समोर, पुणे) आणि त्यांच्या एका साथीदाराविरूध्द (Pune Criminals) मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपी हे सध्या येरवडा कारागृहात (Yerwada Jail) आहेत. (Pune Crime News)

टोळी प्रमुख प्रेम शिंदेने संघटित टोळी तयार करून अनेक गुन्हे केले आहेत. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुमार यांनी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्फत अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्याकडे मोक्का कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. सदरील प्रकराची छाननी करून प्रेम शिंदे टोळीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यापासून आतापर्यंत 27 टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील
(IPS Smartana Patil), सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगांवकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार (Sr. PI Vijay Kumbhar),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (PI Vijay Puranik), निगराणी पथकाचे
सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत माने
(ASI Chandrakant Mane), पोलिस अंमलदार नरेंद्र महांगरे, महेश बारवकर आणि विशाल वारूळे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title :  Pune Crime News | Action under the Mokka Act against the Prem Ankush Shinde gang creating riots in Katraj-Ambegaon Bu.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol-Diesel Price Today | आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

Pune Crime News | आरटीओचा भोंगळ कारभार, आयो जायो घर तुम्हारा ! आरटीओमध्ये परस्पर 9 वाहनांना दिले बनावट सटिर्फिकेट

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाच्या सरी; उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम

Biporjoy Cyclone Updates | गुजरातनंतर आता ‘बिपरजॉय’ राजस्थानला धडकणार; अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या