Pune Crime News | प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीचा विनयभंग करुन आईला केली मारहाण

पुणे : Pune Crime News | प्रेमसंबंध (Love Affair) तोडल्यानंतर तरुणीचा हात पकडून तिचा विनयभंग (Molestation) करणार्‍याला अडविण्याचा प्रयत्न केल्याने त्याने तिच्या आईच्या पोटात लाथ मारुन जखमी केले. इतकेच नाही तर ससून रुग्णालयात आईला घेऊन गेल्यानंतर तेथून परत येताना वाटेत रिक्षा अडवून एकाच्या मानेवर वार करुन जबर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी आंबेगाव पठार येथील एका १९ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु.रजि. नं. १२९/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी समर्थ परेदशी (रा. गणेशनगर, आंबेगाव पठार) व त्यांच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आंबेगाव पठार व प्यासा हॉटेल येथे रविवारी रात्री साडेअकरा व मध्यरात्री दीड वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी समर्थ यांचे ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
परंतु तीन महिन्यांपासून फिर्यादी या आरोपीसोबत बोलत नसल्याचा समर्थ याला राग होता.
तो तिचा पाठलाग करत असे. फिर्यादी या रात्री घरासमोर पाणी भरत असताना आरोपी मित्रांसोबत तेथे आला.
फिर्यादीला “तू मला पाहिजे तू मला खूप आवडतेस” असे म्हणून फिर्यादीचा हात पकडून तिच्याशी लज्जास्पद
वर्तन केले. तिचा आरडाओरडा ऐकून फिर्यादीची आई व भाऊ आले.
त्यांना समर्थ याने शिवीगाळ करुन आईच्या पोटात लाथ मारली. फिर्यादी या तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेल्या.
तेथून आईला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. फिर्यादी या पैसे आणण्याकरीता घरी जात असताना आरोपीने रिक्षामधून येऊन त्यांना अडविले. फिर्यादी यांच्याबरोबर असलेल्या एकाच्या थोबाडीत मारली. समर्थच्या मित्राने त्याच्या मानेवर वार करुन जखमी करुन ते पळून गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक घोगरे तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | After breaking up the relationship, the young woman was molested and beaten up by her mother

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPS Sudhir Hiremath | पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) नियुक्ती

Pune Kasba Peth Bypoll Election | चंद्रकांत पाटलांची ‘महाविकास’वर सडकून टीका; म्हणाले – ‘दिशाहीन काँग्रेसचा उमेदवार विधानसभेत जाऊन काय करणार?’