Pune Crime News | ऐन दिवाळीत पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना विमानतळ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोहगाव-वाघोली रोडवरील एच.पी. पेट्रोल पंपावरील (HP Petrol Pump Lohgaon-Wagholi Road) कर्मचाऱ्यांना लोखंडी हत्याराचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना विमानतळ पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.11) रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली होती. आरोपींनी तोंडाला रुमाल बांधून पंपावरील ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना हत्याराचा धाक दाखवून, 28 हजार 800 रुपये जबरदस्तीने चोरुन नेले होते. तसेच मोबाईल फोडुन मारहाण केली होती. (Pune Crime News)

आशुतोष संतोष साठे व आकाश हरेंद्र शर्मा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत राहुल भिमराव पिंगळे (वय- 24 रा. दादाची वस्ती, लोहगाव-वाघोली रोड, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांविरुद्ध आयपीसी 392, 427, 452, 34 आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार उमेश धेंडे यांना माहिती मिळाली की, पवार वस्ती लोहगाव येथे राहणारा आकाश शर्मा याला हा गुन्हा करणाऱ्यांची माहिती आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने लोणावळा येथील मित्रांनी गुन्हा केल्याची माहिती दिली. (Pune Crime News)

तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आरोपींचा शोध घेत असताना आशुतोष साठे याला गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह पौड येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता हा गुन्हा आकाश शर्मा याने दिलेल्या माहितीवरून केल्याचे सांगितले. या गुन्ह्यात आकाश याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. दोघांना अटक करुन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून रोख रक्कम व हत्याराबाबत पोलीस तापस करीत आहेत. तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन (API Vijay Chandan) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील (ACP Sanjay Patil)
यांच्या आदेशावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे (Sr PI Anandrao Khobare), पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता माळी (PI Sangeeta Mali)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस उप निरीक्षक अविनाश शेवाळे,
पोलीस अंमलदार उमेश धेंडे, राकेश चांदेकर, सचिन कदम, शैलेश नाईक, रुपेश पिसाळ, तुषार आल्हाट, अंकुश जोगदंडे,
गिरीश नाणेकर, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, विशाल निलख, ज्ञानदेव आवारी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यात 25 लाखांचा गुटख्याचा साठा जप्त, कोंढवा पोलिसांकडून एकाला अटक