Pune Crime News | स्त्रीधन, पोटगी म्हणून मिळालेली रक्कम लांबवली; मुलीने आपल्याच वडिल, भावाविरुद्ध दिली तक्रार

पुणे : Pune Crime News | खर तर आपल्या मुलीचे घर तुटल्यानंतर तिला आधार देणे, तिला मदत करणे हे वडिल, भावाचे काम. परंतु, तिला परत मिळालेले स्त्रीधन आणि पोटगीची रक्कम वडिल आणि भावाने संगनमत करुन लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी चिपळूण येथील एका ४० वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रामलाल घाशीराम कोठारी आणि अरविंद रामलाल कोठारी (रा. आळंदी रोड) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार २०१६ पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीचे वडिल व भाऊ आहेत.
फिर्यादी यांचे पहिल्या पतीकडून त्यांना २४ लाख रुपयांचे ४२५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने स्त्रीधन म्हणून परत
मिळाले होते. तसेच पोटगी म्हणून ९ लाख रुपयांचा डी डी मिळाला होता.
फिर्यादी यांनी तो डी डी भावाच्या खात्यात जमा केला होता.
हे पैसे व दागिने परत करण्याची तिने आपल्या वडिल व भावाकडे वारंवार मागणी केली.
त्यांनी ती परत न करता शिवीगाळ करुन तिला धमकी देऊन विश्वासघात केल्याचे फिर्यादी म्हटले आहे.
पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Crime News | Amount received as stridhan, alimony deferred; The girl filed a complaint against her own father, brother

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यातील ”त्या” पोस्टरने खळबळ; भाजपच्या गोटात वाढली चिंता

Satara Crime News | साताऱ्यातील ‘त्या’ खुनातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश; दापोलीमधून आरोपींना अटक