Pune Crime News | हॉस्टेलमधून विद्यार्थ्यांचे मोबाईल, लॅपटॉप चोरणारा गजाआड, लोणीकंद पोलिसांची कारवाई

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण मधील 18 गुन्हे उघड, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्ये प्रवेश करुन विद्यार्थ्यांच्या रुममध्ये चार्जिंगला लावलेले मोबाईल, लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्याच्या लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील 18 गुन्हे उघडकीस आले असून 10 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News)

निलेश प्रफुलचंद कर्नावट Nilesh Prafulchand Karnavat (वय-39 रा. मुपो नांद्रा, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई 15 ऑक्टोबर रोजी रायसोनी कॉलेज (Raisoni College) परिसरात केली. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीमधील कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांनी रुममध्ये चार्जिंगसाठी लावलेले मोबाईल, लॅपटॉप पहाटेच्या सुमारास चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चोरट्याचा शोध सुरु केला.

लोणीकंद पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी रायसोनी कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार फरांदे यांना माहिती मिळाली की, रायसोनी कॉलेज परिसरात लॅपटॉप चोरी करणारा चोरटा कॉलेजच्या मुख्य गेट समोर उभा आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी चोरी झालेल्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले. त्यावेळी सीसीटीव्हीमध्ये दिसणारा चोरटा आणि ताब्यात घेतलेला आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने पुणे शहरातील रायसोनी कॉलेज, सिंहगड कॉलेज, सिम्बॉयसेस कॉलेज, एमआयटी कॉलेज, वारजे माळवाडी, देहू, बिबवेवाडी, लोणावळा परिसरातून लॅपटॉप चोरल्याचे कबुल केले. (Pune Crime News)

आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे 27 लॅपटॉप, 1 टॅब व 1 मोबाईल असा एकूण
10 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये लोणीकंद, भारती विद्यापीठ, वारजे, बिबवेवाडी, वानवडी, लोणी काळभोर व दिघी पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास पोलीस नाईक अजित फरांदे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग
संजय पाटील (ACP Sanjay Patil), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे (Sr PI Vishwajeet Kaingde),
पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील (PI Maruti Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव,
रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब सकाटे, पोलीस अंमलदार संदीप तिकोणे, अजित फरांदे, सागर जगताप,
विनायक साळवे, स्वप्नील जाधव, कैलास साळुंके, अमोल ढोणे, आशिष लोहार, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, साई रोकडे,
दिपक कोकरे, शुभम चिनके, सचिन चव्हाण यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका, ”…तेव्हा आम्ही गप्प बसलो”