Pune Crime News | विश्वचषकाचा थरार सुरु असताना पुण्यात रंगला बंदूक, तलवारीचा थरार, दरोडेखोरांकडून दारूच्या दुकानावर दरोडा

तीन लाखांच्या रोख रक्कमेसह दारुच्या बाटल्या पळवल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रविवारी (दि.19) विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता. पुणेकर क्रिकेट विश्वचषकाचा थरार अनुभवत असताना उत्तमनगर परिसरातील (Uttam Nagar) नागरिकांनी बंदूक आणि तलवारीचा थरार अनुभवला. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अहिरे गेट येथील आर आर वाईन्स या दारुच्या दुकानात सहा अज्ञात तरुणांनी दरोडा टाकून लाखो रुपयांची रोकड चोरुन नेली (Dacoity In Pune). वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. (Pune Crime News)

दरोडेखोरांनी आर आर वाईन्स दुकानातून जवळपास तीन लाख रुपयांची रोख रक्कम व दारुच्या बाटल्या चोरुन नेल्या. दरोडेखोर दोन दुचाकीवरुन दरोडा टाकण्यासाठी आले होते. सहा जणांपैकी दोघांच्या हातात तलवार होती. त्यांनी ‘जो कोणी मध्ये येईल त्याला मारुन टाकीन’ अशी धमकी देत हातातील तलवार हवेत फिरवून दहशत निर्माण केली. त्यामुळे परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. (Pune Crime News)

दुचाकीवरुन आलेले आरोपी हे 20 ते 22 वयोगटातील असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली.
गुन्हा घडल्यानंतर दुकानातील कर्मचारी मनोज मोरे यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | तरुणीवर हल्ला करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई!
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 60 वी स्थानबध्दतेची कारवाई

घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय, आरोपीला अटक; 2 महिलांची सुटका, भोसरी परिसरातील प्रकार