Pune Pimpri Crime News | घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय, आरोपीला अटक; 2 महिलांची सुटका, भोसरी परिसरातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | पैश्यांचे आमिष दाखून घरामध्येच महिलांकडून वेश्याव्यवसाय (Prostitute Business) करुन घेतला जात होता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Police) कारवाई करुन दोन महिलांची सुटका करुन एका आरोपीला अटक केली आहे तर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही कारवाई रविवारी (दि.19) पावणे सहाच्या सुमारास एमआयडीसी भोसरी (MIDC Bhosari) येथे केली आहे. (Pune Pimpri Crime News)

याप्रकरणी देविदास आप्पासाहेब हनवते Devidas Appasaheb Hanawate (वय-53 रा. एमआयडीसी भोसरी, मुळ रा. वाखरी ता.जि. जालना) याला अटक केली आहे. तर एका महिलेसह पारधी नावाच्या मोबाईल धारकावर आयपीसी 370(2) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई संदीप भागवत शेप (वय-29) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC at Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी देविदास हा त्याच्या राहत्या घरामध्ये महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री करुन रविवारी सायंकाळी देविदास याच्या एमआयडीसी मधील घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करुन देविदास याला अटक केली आहे.
तर त्याला साथ देणाऱ्या एका महिलेसह पारधी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे (Sr PI Rajendra Nikalje) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

Female Dead Body Found On Metro Site | धक्कादायक! मेट्रो साइटवर सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, खुनाचा संशय

शेतजमिनीच्या वादातून नातेवाईकांनी केली मारहाण, 10 जणांवर FIR; उरुळी कांचन मधील घटना