Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला (Security Guard) चार चोरट्यांनी (Thieves) शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली. त्यानंतर चोरट्यांनी सोसायटीतील फ्लॅटमध्ये घरफोडी (Burglary) करुन रोख रक्कम, सोन्याचे दागिने (Gold Ornaments) चोरून नेले. हा प्रकार (Pune Crime News) गुरुवारी (दि.24) मध्यरात्री एक ते दीड दरम्यान कोंढवा परिसरातील एनआयबीएम रोड वरील (NIBM Road) आनंदपुरम ट्रस्ट समोर अश्विनी क्लासिक सोसायटीत (Ashwini Classic Society) घडला.

याप्रकरणी फरहाजिबा नावेद शेख Farhajiba Naveed Shaikh (वय-43 रा. सोमजीगाव, कोंढवा बु., पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध आयपीसी 458, 380, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी फिर्यादी यांची बहिण राहत असलेल्या अश्विनी क्लासीक इमारतीच्या
सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन बसवून ठेवले.
त्यानंतर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या बहिणीचे फ्लॅटचे दरवाज्याचे लॉक तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला.
घरातील बेडरूम मधील लाकडी कपाटाचे दरवाजा उघडून त्यात ठेवलेले 30 हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाची
सोन्याची चैन (Gold Chain) व 25 हजार रुपये रोख रक्कम असे एकूण 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून
नेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कुदळे (API Kudale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kartikey Malviya – Ragini | अभिनेता कार्तिकेय मालवीयाचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, सचिन कांबळे दिग्दर्शित ‘रागिनी’ गाणं प्रदर्शित!