Pune Crime News | मोटारसायकलचा कट बसल्याच्या रागातून खुनाचा प्रयत्न, हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मोटारसायकलचा कट बसल्याच्या रागातून युवकाच्या खुनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री हडपसर परिसरातील इंदिरानगर वसाहतीमधील म्हाडा कॉलनीतील सार्वजनिक रस्त्यावर घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

रोहित गायकवाड आणि अंबाजी शिंगे (दो. रा. गोसावी वस्ती, हडपसर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
यासंदर्भात अरफात रज्जाक लब्बै (23, रा. 12 ए नं गल्ली, सय्यद नगर, महमदवाडी रोड, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. अरफात हे मंगळवारी त्यांच्या पाहुण्यांकडे जात असताना गोसावी वस्ती या ठिकाणी त्यांच्या मोटारसायकलचा रोहित गायकवाडला कट बसला. (Pune Crime News)

मंगळवारी मध्यरात्री अरफात हे मित्र शाहरूखला भेटण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री इंदिरानगर वसाहत येथे
रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी रोहित गायकवाडने त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा
प्रयत्न (Attempt To Murder) केला. आरोपी अंबाजी शिंगेने शाहरूखला हाताने मारले.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डांगे करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Attempted murder out of anger over motorcycle conspiracy, incident in Hadapsar area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा मध्य प्रदेशातील चंदनाच्या कारखान्यांवर छापा; 15 लाखांचे चंदनाचे तेल व लाकुड हस्तगत, राज्यात प्रथमच चंदन तस्करीच्या मुळापर्यंत पोहचले पोलीस

Nitesh Rane | ‘लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणाऱ्यांनी…’, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणेचा प्रहार