Pune Crime News | बारामतीतील व्यावसायिकाला पुण्यात मागितली १० लाखांची खंडणी; कारला लावली होती खंडणी मागणारी चिठ्ठी

पुणे : Pune Crime News | बारामती (Baramati News) येथील व्यावसायिक (Businessman) पुण्यात जेवायला आले असताना त्यांच्या कारला चिठ्ठी लावून १० लाख रुपयांची खंडणी (Extortion Case) मागण्याचा प्रकार समोर आला आहे. तुला तुझा व तुझ्या कुटुंबियांचा जीव वाचवायचा असल्यास आम्हाला कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथे १० लाख रुपये आणून दे, अशी धमकी देण्यात आली आहे. (Pune Crime News)

याबाबत बारामती येथील एका ३७ वर्षाच्या व्यावसायिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२८/२३) दिली आहे. हा प्रकार ३१ जुलै रोजी रात्री साडेआठ ते १ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय (Import Export Business) आहे.
ते आपल्या मित्रांसह कोरेगाव पार्क येथील डेझर्ट वॉटर (Desert Water Koregaon Park) येथे जेवणाकरीता आले होते.
त्यांनी आपली कार पार्किंगमध्ये पार्क करुन जेवायला गेले.
जेवण करुन परत आल्यावर त्यांना दरवाजावर बंद पाकिट चिटकविलेले होते.
त्यात फिर्यादी व त्यांचे कुटुंबियास जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन
१० लाख रुपयांची मागणी (Ransom Case) केली होती.
त्यात दिलेल्या नंबरवर त्यांनी मित्राचा मोबाईलवरुन फोन केल्यावर तो कोणी उचलला नाही.
त्यानंतर दुसर्‍या दिवशी ते जेजुरी येथे असताना मित्राचे मोबाईलवर फोन आला.
तुला, तुझ्या कुटुंबियांचा जीव वाचवायचा असल्यास आम्हाला कोरेगाव पार्क या ठिकाणी १० लाख रुपये आणून दे,
अशी धमकी दिली. कोरेगाव पार्क पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PSI Murder News | धक्कादायक! धारदार शस्त्राने वार करुन पोलीस उपनिरीक्षकाचा निघृण खून