Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून तडीपार आदेशाचा भंग करणार्‍या गुन्हेगाराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात फिरणार्‍याला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) अटक केली आहे. प्रशांत सुरेश कांबळे Prashant Suresh Kamble (26, सध्या रा. आनंदनगर झोपडपट्टी, नरेश सुपर मार्केटसमोर, बाबु भंडारी चौक, चिंचवड, पुणे. मुळ रा. हासोरी, ता. निलंगा, जि. लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत सुरेश कांबळे याला पुणे शहर आणि पुणे जिल्हयाच्या हद्दीतून तडीपार केले होते. तडीपार असताना देखील आदेशाचा भंग करत कुठलीही पुर्व परवानगी न घेता तो शहरात फिरत होता. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंमदलार हर्षल शिंदे आणि धनाजी धोत्रे यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. (Pune Crime News)

 

प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचुन प्रशांत कांबळेला ताब्यात घेतले.
त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumbhar), पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (PI Vijay Puranik), सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal), पोलिस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, राहुल तांबे आणि विक्रम सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title : Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police arrested a criminal who is tadipar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा