Pune Crime News | बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल (Pistol) जवळ बाळगून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. आरोपींकडून पिस्तूल, एक काडतूस (Cartridge) जप्त करण्यात (Pune Crime News) आले आहे.

 

आकाश उद्धव कोपनर (वय – 21, रा. कात्रज, मूळ. रा. नगर), सनी विनोद मेहरा (वय- 26, रा. कात्रज, मूळ. रा. नाशिक) अशी अटक करण्यात आरोपींची नावे आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील (Bibvewadi Police Station) तपास पथक हद्दीत पेट्रोलींग करत असताना गंगाधाम रस्ता परिसरात दोघेजण दुचाकीवरून फिरत असून त्यातील एकाच्या कंबरेला पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच, आरोपी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. (Pune Crime News)

 

पोलिसांनी तात्काळ गंगाधाम रस्ता परिसरात जाऊन  सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
त्यांची अंगझडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी आकाश कोपनर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक संगीता जाधव (Senior Inspector Sangeeta Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे (API Pravin Kalukhe), उपनिरीक्षक संजय आदिंलग (PSI Sanjay Adinlag) यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

 

Web Title :- Pune Crime News | Bibwewadi police arrested two for carrying illegal pistols

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | शनिवारी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत होणार महारोजगार मेळावा, विवाह संस्कार मेळावा

Chinchwad Bypoll Election | ‘मला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश पाहिजे’; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले

Aurangabad Crime | बापाच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागून पोटच्या मुलांनीच केली बापाची हत्या