Pune Crime News | लेखक राजन खान यांच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | लेखक राजन खान (Writer Rajan Khan) यांचा मुलगा डेबू खान (Debu Khan) याने २ ऑक्टोबर रोजी शिंदेवस्ती सोमाटणे येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली होती. या प्रकरणी आता तळेगाव दाभाडे पोलिसांनी (Pune Police) चौघांना अटक केली आहे. डेबूला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी डेबू खान आत्महत्याप्रकरणी पांडुरंग सूर्यवंशी उर्फ देवा (रा. हडपसर, पुणे), प्रतीक जाधव (रा. भारती विद्यापीठ, पुणे), गणेश वाळुंज आणि आकाश बारणे उर्फ नन्या माऊली वडेवाले (दोघेही रा. कात्रज, पुणे) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी डेबूच्या बहिणीने १७ ऑक्टोबर रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ डेबू याने आरोपींना बचत गटाचे तसेच बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे दिले होते.

आरोपींना दिलेले पैसे डेबू परत मागत होता. मात्र, आरोपींनी पैसे आम्हाला दिलेच नाहीत, असे म्हणून टाळाटाळ केली.
तसेच, न वटणारे धनादेश देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली. आरोपींनी वारंवार दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून
डेबू याने २ ऑक्‍टोबर रोजी शिंदे वस्ती, सोमाटणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात ओढून उकळली 8 लाखांची खंडणी, पुण्यातील पती-पत्नीसह तिघांवर FIR

Lalit Patil Drugs Case | ससून ड्रग्ज प्रकरण : पुणे पोलीस ललित पाटीलवर मोक्का अतंर्गत कारवाई करण्याच्या तयारी

Pune News | पुणे रेल्वे स्थानकात ‘फेस रेकग्निशन सिस्टिम’चे १२० सीसी टीव्ही कॅमेरे, आरोपी ओळखून देणार माहिती, जाणून घ्या…