Pune Crime News | उपचारासाठी भारतात बोलावून वेश्या व्यवसायात ढकलले, गुन्हे शाखेकडून बांगलादेशी तरुणीची सुटका

कुंटणखाना चालवणाऱ्या ‘स्वीटी’ सह महिला दलालावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फेसबुकवर ओळख झालेल्या बांगलादेशी तरुणीला त्वचारोग डॉक्टरांकडून (Dermatology Doctor) उपचार करुन घेण्यासाठी भारतात बोलावून घेतले. त्यानंतर मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय (Prostitute Business) करवून घेतला. गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell) बुधवार पेठेतील कुंटनखान्यावर छापा टाकून एका 19 वर्षाच्या बांगलादेशी तरुणीची सुटका करुन दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या (SS Cell Pune) महिला पोलीस हवालदार रेश्मा गणपत कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुंटणखाना मालकीन लाखी उर्फ स्विटी अकबर शेख Lakhi alias Sweety Akbar Sheikh (वय-34 रा. रविवार पेठ, पुणे), दलाल मिना उर्फ सिमा Dalal Mina alias Sima (पूर्ण नाव पत्ता महित नाही) तसेच घरमालक मुन्ना शेख याच्यावर आयपीसी 370, 34 व पिटा अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.9) रात्री आठच्या सुमारास करण्यात आली. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला दलाल आणि पीडित मुलीची ओळख फेसबुकवर झाली.
आरोपी महिलेने तरुणीला पुण्यात ओळखीचे त्वचारोग डॉक्टर असून त्यांच्याकडून तुझी ट्रिटमेंट करुन घेऊ असे
सांगून तरुणीला विमानाने पुण्यात बोलावून घेतले. त्यानंतर तरुणीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला.
सामाजिक सुरक्षा विभागाने कुंटणखान्यावर छापा टाकून पीडित तरुणीची सुटका केली. पुढील तपास फरासखाना पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील बुधवार पेठेत ‘सासु’ची पुन्हा मोठी कारवाई, 7 बांगलादेशी महिलांना अटक

Cyber Fraud Case | सावधान! वकिलाने गमावले 9 लाख, गंडा घालण्याचा सायबर चोरट्यांचा नवा फंडा