Pune Crime News | जुनी 500 ची नोट मागण्याच्या बहाण्याने रोकड लंपास, स्वारगेट परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मेडिकल दुकानामध्ये आलेल्या अज्ञात चोरट्याने सुट्टे पैसे देऊन जुनी 500 रुपयेची नोट मागून पाचशे रुपयांचा बंडल लंपास केला. ही घटना मुंकुंदनगर येथील एचडीएफसी बँकेजवळ असलेल्या मेडप्लस नावाच्या मेडिकल दुकानात 31 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान घडली आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) आयपीसी 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लक्ष्मण मारुती घाग (वय-50 रा. चौगुले वस्ती, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घाग हे मेडिकल शॉपमध्ये काम करतात. ते दुकानामध्ये असताना हेल्मेट घातलेली एक व्यक्ती दुकानात आली. त्याने शंभर रुपयांच्या पाच नोटा दिल्या आणि पाचशे रुपयांची एक नोट फिर्यादी यांच्याकडे मागितली. त्यांनी सुट्टे पैसे घेऊन त्या व्यक्तीला पाचशेची नोट दिली. त्यावेळी त्याने जुनी पाचशेची नोट पाहिजे असल्याचे सांगितले. (Pune Crime News)

घाग यांनी पाचशे रुपयांचा नोटांचा बंडल काढला. आरोपीने नोटांचा बंडल घेऊन त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यांची नजर चुकवून ड्रॉवरमध्ये हात घालत मी तुम्हाला नोटांचे बंडल व्यवस्थित करुन देतो असा बहाणा केला. त्यानंतर त्याने बंडलमधून 500 रुपयांच्या 41 नोटा आणि 200 रुपयांची एक नोट असा एकूण 20 हजार 700 रुपये काढून घेत दुचाकीवरुन पळून गेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Meeting | कॅबिनेटमध्ये गँगवॉरसारखी परिस्थिती, एका मंत्र्याच्या… संजय राऊतांच्या आरोपाला हसन मुश्रीफांचे उत्तर

Pune Police Mcoca Action | तलावारीचा धाक दाखवून व्यवसायिकांना लुटणाऱ्या रोहन चव्हाण व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 81 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA