Pune Crime News | आजारी असल्याचा बहाणा करून पादचारी मुलीस स्वतःच्या गाडीवरून पुढं सोडण्यास सांगून अश्लील चाळे करणार्‍या सदाशिव पेठेतील एकाला चतुःश्रृंगी पोलिसांकडून अटक

तिनं पुणे पोलिसांना ट्विट केल्यानंतर अवघ्या काही तासात कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिसांनी (Pune Police) महिलांच्या सुरक्षिततेच्या (Woman Security) पार्श्वभुमीवर अलिकडील काळात काही ठोस पावले उचलली आहेत. एवढेच नव्हे तर पोलिस आयुक्तांनी नागरिकांना, महिलांना त्यांच्या तक्रारी तसेच सूचनांसाठी नवीन व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक (Pune Police WhatsApp Number) देखील सुरू केला आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून त्याव्दारे अनेक तक्रारी देखील पोलिसांना प्राप्त होत आहेत. अशातच पुणे पोलिसांना ट्विट करून एका युवतीनं तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला अन् संबंधिताला शिक्षा देण्याची मागणी केली. चतुःश्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) काही तासातच कुठलाही पुरावा नसताना नराधमाला शोधून काढून बेडया ठोकल्या. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 6 जुलै 2023 रोजी रात्री 10 वाजता फिर्यादी युवती आणि तिची मैत्रीण सोनापती बापट रोडने (SB Road Pune) बालभारती इमारतीच्या (Balbharti Building Pune) समोरून सायकल घेऊन पायी जात होत्या. त्यावेळी 40 ते 45 वयाच्या व्यक्तीने त्यांच्या जवळ जाऊन त्यास चक्कर येत आहे. त्यामुळी तुम्ही मला माझ्याच स्कुटीवर पुढे सोडा अशी विनवणी केली. माणुसकीच्या नात्याने युवतीने त्यास मदत करण्यासाठी त्याची गाडी घेतली. तो पाठीमागे बसला होता. (Pune Crime News)

 

काही अंतरावर गेल्यानंतर त्याने युवतीला चुकीच्या पध्दतीने कंबरेवर आणि छातीवर स्पर्श करण्यास सुरूवात केली. युवतीने त्याबाबत त्यास बर्‍याच वेळा सांगितले तरी देखील त्याचा स्पर्श वाढत होता. युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याने आणि तिला भिती वाटल्याने तिने गाडी थांबवून काही मुलांना मदत मागितली. 45 ते 45 वर्षाच्या व्यक्तीस तिथेच सोडले. काही वेळात फिर्यादीची मैत्रिणी सायकलवरून तिथे आली. फिर्यादी युवतीने घडलेला प्रकार सांगितले.

दरम्यान, याबाबत पुणे पोलिसांना ट्विट प्राप्त झाले. प्रकार चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडल्यामुळे घटनेची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीचा माग काढला.

 

चतुःश्रृंगी पोलिसांनी याप्रकरणी अनुप प्रकाश वाणी (44, रा. 753, कोटक महिंद्रा बँक समोर,
सदाशिव पेठ, पुणे) याला विनयभंग केल्याप्रकरणी (Molestation Case) अटक केली आहे.
अनुप वाणी याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने अशा प्रकारे अनेक महिला व युवतींचा विनयभंग केले असल्याचे सांगितले आहे.

 

अशा प्रकारची घटना कोणासोबत घडली असेल तर त्यांनी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये
जाऊन तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr PI Balaji Pandhre) आणि त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेवून त्याला अटक केली आहे.

 

 

Web Title : Pune Crime News | Chaturshringi Police Arrest Anup Prakash Vani Sadashiv Peth In Molestation Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा