Devendra Fadnavis | ‘हा अधर्म नाहीय ही कुटनीती आहे’, शिवसेना फोडण्यावर देवेंद्र फडणवीसांनी दिले कर्णाचे उदाहरण (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबतची युती (Alliance) का तुटली याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले गेलेच नव्हते. त्या रात्री भाजप नेते अमित शाह (BJP Leader Amit Shah) यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली याचा खुलासा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. भिवंडीतील महाविजय 2024 पदाधिकारी मेळाव्यात (BJP Mahavijay Workshop) ते बोलत होते.

 

ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली तेव्हा मुख्यमंत्री भाजपचा (BJP CM) होईल असा निर्णय झाला होता. तसेच अमित शाह यांनी शिवसेनेला (Shivsena) जादा मंत्रीपदांची ऑफर दिली होती. ठाकरेंना अमित शाह यांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता असं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. आम्ही जेव्हा जिंकत होतो, तेव्हा मी नागपूरमधून उद्धव ठाकरे यांना फोन केला की एकत्र पत्रकार परिषद घेऊ. यावर ठाकरेंनी मला मी आता घेतोय तुम्ही नंतर घ्या असे सांगितले होते.

 

त्यांनी आम्हाला सर्व दरवाजे मोकळे असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मला जेव्हा मध्यरात्री उद्धव ठाकरेंचा फोन आला तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले होते. मी शहांना तेव्हाच फोन केला होता. त्यांनी तसे काही ठरले नसल्याचे सांगितले. मी पुन्हा उद्धव ठाकरेंना फोन करुन हे सांगितले होते. तेव्हा त्यांनी युती शक्य नसल्याचे कळविले होते, असे फडणवीस यांनी सांगितले.

 

गाफिल राहिलो ही चूक केली

तरीही आम्ही तीन दिवस थांबलो होतो. विश्वास ठेवला होता. आपण गाफिल राहिलो ही चूक केली. ठाकरेंनी आधीच त्याची तयारी केली होती. पण आज जे आपण करतोय तो अधर्म नाहीय, तुम्ही त्याची चिंता करु नका, तो धर्म आहे. महाभारतानेच (Mahabharata) हेच शिकवले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यावरून त्यांनी हे भाष्य केले आहे.

 

हा अधर्म नाही ही कुटनीती

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कर्णाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, कर्णाची कवचकुंडले (Karna Kavachkundale) काढून घेतल्याशिवाय कर्णावर विजय मिळविता येणार नाही, हे कृष्णाला (Shri Krishna) माहिती होते. भीष्माला (Bhishma) पराभूत करण्यासाठी शिखंडीला उतरविले. सुर्यास्त भासविला, द्रोणाचार्यांना (Dronacharya) जेव्हा अश्वत्थामा (Ashwatthama) गेला असे सांगायचे होते, तेव्हा नरोवा कुंजरोवा (Narova Kunjarova) हे सांगताना एवढ्या जोरात शंख वाजवला की त्यांना फक्त अश्वत्थामा गेला एवढेच ऐकायला गेले. हा अधर्म नाहीय ही कुटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कुटनीती वापरावीच लागेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

 

कुटनीती वापरली तर युद्धात विजय मिळेल

अनेकजण नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करत आहेत.
कुठे कुटनीती वापरली तरच युद्धात विजय मिळतो, हे कृष्णाला माहित होते. लोक म्हणतात दोन पक्ष फोडले,
घर फोडले. मला सांगा सुरुवात कोणी केली. पक्ष फोडल्याचे संगातायत मग मला सांगा एकनाथ शिंदे
(Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) काय काल राजकारणात आले आहेत का? मी त्यांच्यावर मोहिनी घातली का? जेव्हा पक्षात अन्याय होईल तेव्हा तेव्हा शिंदे जन्माला येतील असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. शिवसेनेसोबतची इमोशनल युती आहे, राष्ट्रवादीशी (NCP) राजकीय. कदाचित पुढील 10-15 वर्षात ती देखील इमोशनल युती होईल, असेही फडणवीस म्हणाले.

 

उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीरच खुपसला

2019 साली उद्धव ठाकरे यांनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला.
बेईमानी शिवाय याला दुसरं काही म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे
यांनी मोदींचे (PM Narendra Modi) फोटो लावून मते मागीतले.
त्यानंतर ते काँग्रेससोबत (Congress) गेले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे
यांच्या उमेदवारांना जिंकून देण्यासाठी घाम गाळला. शिवसेनेने भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीत खुपसलेला हा खंजीर आहे. अमित शाह म्हणाले दहा अपमान सहन कर पण बेईमानी सहन नको करुस. बाईमानी सहन करणारे राजकारणात टिकत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

 

Web Title : Devendra Fadnavis | what-we-are-doing-is-dharma-not-adharma-devendra-fadnavis-gave-
an-example-of-breaking-shiv-sena-uddhav-thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा