Tamanna Bhatia | तमन्ना आणि जॉन अब्राहम करणार ऑन स्क्रीन रोमांस; दोघांचे चाहते खूश

पोलीसनामा ऑनलाइन – Tamanna Bhatia | अभिनेत्री तमन्ना हि तिच्या लस्ट स्टोरीज 2 या चित्रपटापासून चर्चेच्या वर्तुळात आहे. चित्रपटात तमन्नाने दिलेले बोल्ड (Tamanna Bold Scene) व किसिंग सीन पाहून तिचे चाहते देखील अवाक झाले. लस्ट स्टोरीज 2 (Lust Stories 2) च्या निमित्ताने तमन्ना तिची 18 वर्षांपासूनची नो किसिंग पॉलिसी संपुष्टात आणली. या चित्रपटामध्ये अभिनेता विजय वर्मासोबत (Vijay Varma) तिने हे सीन दिले. विजय हा तमन्नाचा आता बॉयफ्रेंड (Tamanna Bhatia Boyfriend) देखील आहे. यानंतर आता तमन्ना (Tamanna Bhatia) अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सोबत रोमांस करताना दिसणार आहे.

 

 

 

 

अभिनेत्री तमन्ना व अभिनेता जॉन अब्राहम हे आता एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. याबद्दलची माहिती अभिनेत्री तमन्नाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. तमन्ना व जॉन अब्राहम (Tamanna and John) पहिल्यांदा एकत्र काम करणार असलेल्या या सिनेमाचे नाव ‘वेदा’ (Vedaa) हे असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक निखिल अडवाणी (Director Nikhil Advani) सांभाळणार आहे. यामध्ये अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या ‘वेदा’ चित्रपटामध्ये तमन्ना व जॉन ऑन स्क्रीन किसिंग सीन देणार असल्याचे बोलले जात आहे. (Tamanna and John Kissing Scene) यामुळे दोघांचे चाहते खुश असून त्यांची कैमिस्ट्री पाहण्यासाठी उत्सुक आहे.

 

 

 

तमन्नाने (Tamanna Bhatia) तिच्या अकाऊंटवर तिचा जॉनचा व निखिल सोबतचा फोटो शेअर केला आहे. या खाली तिने कॅप्शनमध्ये ती आता चित्रपटाचा भाग असणार असल्याचे सांगितले आहे. तमन्नाने लिहिले आहे की, “माझा हा नवीन प्रवास सुरू करताना खूप थ्रिल आणि उत्साही वाटत आहे. अतिशय खास भूमिकेसाठी वेदा कुटुंबामध्ये शामिल होत आहे. अशा सर्वात्तम टीम सोबत काम करण्यासाठी आता आणखी प्रतिक्षा नाही पाहू शकत.“ ‘वेदा’ हा चित्रपट हाय-ऑक्टेन अॅक्शन व ड्रामाने भरलेला असणार आहे. चित्रपटाचे लेखन असीम अरोरा (Asim Arora) यांनी केले असून झी स्टुडिओज (Zee Studios), एम्मे एंटरटेनमेंट आणि जेए एंटरटेनमेंट यांनी निर्मिती केली आहे. वेद हा चित्रपट 2024 साली प्रदर्शित होणार आहे.

 

 

 

 

 

Web Title :  Tamanna Bhatia | tamannaah bhatia ready to bang with new project actress will romance with john abraham in super action movie

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा