Pune Crime News | दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीला चतु:श्रृंगी पोलिसांकडून अटक, 43 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरातील औंध परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल 66 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना (Pune Crime News) 11 डिसेंबर 2022 रोजी दुपारी दीड ते चार या दरम्यान सिंध हौसिंग सोसायटी (Sindh Housing Society), बाणेर रोड, औंध येथे घडली होती. या गुन्ह्यतील आरोपींना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चोरीचे दागिने खेरदी करणाऱ्या दोन सोनारांचा समावेश आहे. आरोपींकडून 43 लाख 40 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

खुशबू दिलीप गुप्ता (वय 19 रा. सरकारी दवाखान्याजवळ, जिल्हा जालना), अनु पवन आव्हाड (वय 35 रा. पारधी वस्ती, राजापूर फाटा, ता. गेवराई, जिल्हा बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर चोरीचा मुद्देमाल विकत घेणारे सोनार महावीर धनराज चपलोत (रा. कोपरी कॉलनी ठाणे) आणि मदन रामेश्वर वैष्णव (रा. भाजी मार्केट शिवाजीनगर कळवा, ठाणे) यांना देखील अटक केली आहे. या गुन्ह्यातील दोन महिला आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत समीर रामेश्वर दयाल Sameer Rameshwar Dayal (वय-55) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध आयपीसी 454, 380 अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

फिर्यादी समीर दयाल यांची पिंपरी चिंचवड परिसरात पॅकिंग करणारी कंपनी असून ते औंध परिसरात राहतात. घटनेच्या दिवशी दुपारी दीडच्या सुमारास ते कुटुंबासोबत जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या पाठीमागील दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील बेडरुममधील कपाटाचे लॉक तोडून 66 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून यातील संशयित आरोपींचे तांत्रिक विश्लेषण मार्फत माहिती
मिळवली. आरोपी हे जालना आणि बीड येथील असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांची दोन पथके
आरोपींच्या मागवर रवाना केली. पथकाने वेशांतर करुन पारधी वस्ती जालना व बीड येथून दोन जणांना अटक
करुन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 825.75 ग्रॅम सोन्याचे
दागिने, 1605 ग्रॅम चांदीचे दागिने, 1 होन्डा शाईन दुचाकी, 3 घड्याळ, 2 कॅमेरे, 2 स्क्रू ड्रायव्हर, 1 कटावणी,
वजनकाटा असा एकूण 43 लाख 40 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा
(Addl CP Ranjan Kumar Sharma) , पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat),
सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Senior Police Inspector Balaji Pandhare),
पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण (Police Inspector Ankush Chintaman),
पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके (PSI Rupesh Chalke), निलेशकुमार महाडीक
(PSI Nilesh Kumar Mahadik), पोलीस अंमलदार बाबुलाल तांदळे, श्रीकांत वाघवले, सुधाकर माने,
ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, इरफान मोमीन, बाबासाहेब दांगडे, किशोर दुशिंग यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Chaturshringi police arrest gang who burglarized houses during the day, seize 43 lakhs in compensation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | वारजे माळवाडी येथील सराईत गुन्हेगार कार्तिक इंगवले व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 6 वी कारवाई

Satyajit Tambe | सत्यजित तांबे यांना सपोर्ट करणाऱ्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस