Pune Crime News | माल न पुरवता ९१ लाखांना लावला चुना; व्यावसायिकाला घातला गंडा

पुणे : Pune Crime News | मागणीप्रमाणे कच्चा माल (Raw Material) व कागद पुरविण्याचे आश्वासन देऊन त्या बदल्यात ९१ लाख ५४ हजार रुपये घेऊन त्याचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी नरेंद्र पंडीतराव पाटील (वय ४४, रा. पंचवटी, पाषाण) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उस्मान रशिद शेख (रा. लँडमार्क एम्पायर कन्स्ट्रक्शन, केदारीनगर, वानवडी), आतिक उस्मान शेख, आसिफ शेख, जिलानी नजीर सुभेदार (रा. हांडेवाडी) सनी सुभाष खानविलकर (रा. हांडेवाडी), राहुल सखाराम लांडगे (रा. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार २३ फेबुवारी २०१६ ते १५ जुलै २०१७ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची डब्ल्यु वेस्ट कॉर्पोरेशन ही फर्म आहे.
त्यांच्या ओळखीचे उस्मान शेख यांनी इतरांच्या मदतीने त्यांच्या फर्मला कच्चा माल व कागद पुरविण्याचे आश्वासन दिले.
आरोपीच्या मुनलाईट फर्मच्या माध्यमातून हा माल पुरविणार असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
कच्चा माल पुरविण्याच्या बदल्यात त्यांच्या ९१ लाख ५४ हजार ६९१ रुपये रोख तसेच ऑनलाईन घेतले.
मात्र, त्यानंतरही त्यांनी कोणताही माल पुरविला नाही. फिर्यादी यांनी अनेकदा मागणी केल्यानंतरही त्यांचे पैसे
परत न केल्याने शेवटी त्यांनी फसवणुकीची (Cheating Case) तक्रार दिली असून
पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Cheating of 91 lakhs without supply of goods; The business man was beaten

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | शासकीय अधिकारी तरुणीवर ओळखीतून केला अत्याचार; अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले १६ लाख ८६ हजार

Jalgaon Crime News | मुलाच्या डोळ्यादेखत जन्मदात्या बापाने सोडला जीव

Sachin Tendulkar | वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांचा उभारणार पुतळा; मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय