Pune Crime News | दुचाकीच्या चोरीसाठी भामट्यांची अनोखी शक्कल ! टेस्ट ड्राइव्हचा बहाण्याने दुचाकी पळवली, दिवसाढवळ्या घडला प्रकार

जुन्नर (पुणे) : Pune Crime News | जुन्नर तालुक्यातील आळेफाटा (Alephata Junnar) येथे चोरीचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. जुनी दुचाकी खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी टेस्ट ड्राइव्ह (Test Drive) करण्याच्या बहाण्याने गाडी नेली आणि तसेच ते पसार झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसात (Pune Rural Police) गुन्हा दाखल झालेला नसून विक्रेत्याकडून दुचाकीचा शोध सुरू आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, आळेफाटा येथे जुन्या गाड्या खरेदी विक्री करण्याचे किशोर बायस यांचे दुकान आहे. रविवारी दुपारी जुनी गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने दोघा संशयित भामट्यांनी दुचाकी विक्रेत्याकडून टेस्ट ड्राईव्हसाठी (एम.एच १४ एचएन ७६३३) ठेवली होती. दोघा संशयित भामट्यांनी तेथे उभ्या असलेल्या सर्व दुचाकी पाहिल्यानंतर हिरो डेस्टिनी स्कूटर पसंत केली. यावेळी भामट्यांनी इंजिन तपासणीसाठी किशोर बायस यांच्याकडे दुचाकी टेस्ट ड्राईव्हला नेण्यासाठी चावी मागितली. यावेळी किशोर बायस यांनी त्यांना आपण कुठले विचारले असताना जवळचेच असल्याचे सांगितले. त्यावेळी किशोर बायस यांनी तळघरात असलेल्या दुकानातून दुचाकी काढून टेस्ट ड्राईव्हला नेण्यासाठी चावी दिली. (Pune Crime News)

मात्र, संबधित दोघे संशयित भामट्यानी दुचाकी टेस्ट ड्राईव्हला घेऊन गेले मात्र बऱ्याचवेळ झाला परत आलेच नाही. त्यांना याबाबत संशय आल्याने आपली दुचाकी पळवून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. बायस यांनी आळेफाटा पोलिसांना याबाबतची माहिती दिली असून अद्याप याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र खरेदी-विक्री व्यावसायिक किशोर बायस यांचा दुचाकीचा शोध सुरु होता.

आळेफाटा खरेदी-विक्रीचे मोठे मार्केट असून येथे यापूर्वी विक्रीसाठी उभ्या असललेल्या अनेक छोट्या-मोठ्या
वाहनांची चोरी झाली आहे. त्यातील अनेक वाहनांचा अद्याप शोध लागला नाही.
मात्र आता संशयित भामट्यांनी नवी शक्कल वापरून दुचाकी लंपास केली आहे.
या घटनेने आळेफाटा वाहन खरेदी-विक्री व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
दुचाकी नेणारे हे दोन्ही भामटे सीसीटिव्ही कैद झाले असून लवकर त्यांना पकडण्यात यश येईल अशी चर्चा परिसरात होती.

Web Title : Pune Crime News | criminals unique look for theft of two-wheelers! The bike was stolen under the pretext of a test drive, the incident happened in broad daylight

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Popatrao Gawade | राष्ट्रवादीचे माजी आमदार, शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडे रूबी हॉलमध्ये दाखल, उपचार सुरू

Salman Khan | अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षितेत वाढ