Pune Crime News | क्रेटा कार व उमरा यात्रेच्या आमिषाने कोटयावधीची फसवणूक ! नादिर अब्दुल हुसेन नाईमाबादी व मौलाना शोएब आत्तारसह 3 जणांवर गुन्हा

चौथा गुन्हा दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – Pune Crime News | वेगवेगळ्या कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ६ जणांना तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

मौलाना शोएब मोईनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), अफिफा शोएब आत्तार, खालीद मोईनुद्दीन आत्तार, माजीद उस्मान आत्तार आणि अब्दुल हुसेन हसन अली नाईमआबादी (रा. कॅम्प) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपीविरुद्ध या पूर्वी समर्थ, लष्कर, कोंढवा पोलीस ठाण्यात कोट्यवधींची फसवणूक केल्याचा गुन्हा (Cheating Fraud Case) दाखल असून त्यांच्यावर आपथ्यकारक औषधीद्रव्य पाणी पिण्यास देवून,जादुटोणासह ठेवीदारांच्या हितसंबंधविषयक कायद्याखालीही (MPID Act) गुन्हा दाखल झाला आहे. (Pune Crime News)

याबाबत फिरोज हसन शेख (वय ४९, रा. अशोक म्युज सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार ५ मार्च २०२० ते १० मार्च २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना दरमहा ३ टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या वेगवेगळ्या कंपनीमध्ये गुंतवणुक करण्यास सांगितले.
नवीन क्रेटा कार फिर्यादीच्या नावे करून व उमरा यात्रा जाण्यासाठी टुर मध्ये ७ लाख रु भरून दिले .
तसेच अडीच वर्षासाठी गुंतवणुक केल्यास तिप्पट रक्कम देणार असल्याचे सांगितले.
मिळणारा नफा हा करमुक्त असेल व सर्व जणाचे इन्कमटॅक्स भरणार असल्याचे सांगितले.
आयात निर्यात व्यापारात प्रचंड नफा मिळत असल्याचे भासविले. कोरोना काळात औषधांची मोठी डिल मिळाल्याचे सांगितले.
त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे १ कोटी ५३ लाख रुपयांची गुंतवणूक केली. कांदा ,फळे, भाजीपाल्यासाठी शेतकर्यांना राेख पैसे द्यावे लागत असल्याचे सांगून त्यांच्याकडून रोखीत गुंतवणुक करण्याचा आग्रह धरला. त्यांना ५ ते ७ कोटी रुपये गुंतविण्यास सांगत होते. फिर्यादी यांचे मित्र रियाज इनामदार रोख २५ लाख,रफिक अन्सारी रोख १५ लाख,बाबा शेख रोख १५ लाख,अब्दुल समी कंपली रोख १५ लाख, अब्दुल बासित अब्दुल सामी कंपाली यांनी चेकदूवरे ५३ लाख व इतर अशी सहा जणांकडून २ कोटी ७६ लाख रुपये घेतले. गुंतवणुक केलेली रक्कम परत न करता फसवणुक केली आहे.

या आरोपींवर आतापर्यंत चार एमपीआयडी खाली गुन्हे दाखल झाले आहेत.
त्यांनी आतापर्यंत ६ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
न्यायालयाने काही जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असतानाही त्यांच्यावर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.
असे गुंतवणुकदारांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

केस मागे घेत नाही म्हणून जावयाने सासूवर केले चाकूने वार, नायगाव येथील घटना

पुर्ववैमनस्यातून खुनाचा प्रयत्न, खडकी परिसरातील घटना; तिघांना अटक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; कर्वेनगर परिसरातील प्रकार

Maharashtra Police Recruitment | 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune PMC News | टँकरने होणारी पाण्याची ‘चोरी’, ‘धंदा’ आणि ‘गळती’ला महापालिकेचा लगाम ! रामटेकडी आणि वडगाव शेरी टँकर भरणा केंद्राचे ‘ऍटोमायझेशन’ सुरू