Pune Crime News | डेक्कन पोलिसांकडून 3 वेगवेगळया गुन्हयात तिघांना अटक; खंडणी, विनयभंग अन् कोयता बाळगल्याचे प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | डेक्कन पोलिसांनी (Deccan Police) 3 वेगवेगळया गुन्हयात तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये खंडणी मागणार्‍या, महिलांची छेड काढणार्‍या आणि कोयता बाळगणार्‍याचा समावेश आहे. (Pune Crime News )

 

याबाबत अधिक माहिती की, सुरज रोहिदास नलावडे Suraj Rohidas Nalavde (33, रा. 215, गणेशनगर, कोथरूड) याने कोहिनुर वाईन्सच्या (Kohinoor Wines) मालकाकडे महिन्याला 5 हजार रूपये खंडणी (Extortion Case) स्वरूपात मागुन चाकुच्या धाकाने दारूची बाटली नेली होती. त्याबाबत माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नलावडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी (Criminals On Pune Police Records) असून त्याच्यावर मारामारी, घरफोडी आणि दरोडयासारखे एकुण 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले (PSI Mahesh Bhosale) प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

 

तरूणीचा विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्हयात पोलिसांनी जालिंदर निवृत्ती कदम Jalinder Nivrutti Kadam (35, रा. मानेर, ता. अकोले, जि. अहमदनगर) याला अटक केली आहे. तो बी.एड. करिता डेक्कन येथील आदर्श कॉलेजमध्ये (Adarsh College Pune) पहिल्या वर्षात शिकत असून त्याने महाविद्यालयीन तरूणीस वारंवार फोन करून तसेच समक्ष इच्छेविरूध्द पाठलाग केला होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव (PSI Sandeep Jadhav) हे अधिक तपास करीत आहेत.

आरोपी मानव सचिन इरकल Manav Sachin Irkal (19, रा. होमी भाभा हॉस्पीटलच्या मागे, वडारवाडी, पुणे) हा कोयता घेवुन हनुमान टेकडी सिबॉसिस कॉलेज (Symbiosis College ) परिसरात कोयत्याचा धाक (Koyta Gang) दाखवुन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस हवालदार गभाले प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल (IPS Sandeep Singh Gill) ,
सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत कुवर (ACP Vasant Kuwar),
डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस (Sr PI Vipin Hasabnis),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर साळुंके (PI Shankar Salunke)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले, पोलिस उपनिरीक्षक संदिप जाधव,
पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत (PSI Dattatray Sawant), पोलिस अंमलदार शिंदे, गभाले,
माळी, जाधव, पाथरूट, आल्हाट, गायकवाड, चौबे, साडेकर, बडगे, काळे आणि बोरसे यांच्या पथकाने ही सामुहिक कामगिरी केली आहे.

 

 

Web Title : Pune Crime News | Deccan Police arrests three in 3 separate crimes; Cases of extortion,
molestation and possession of Koyta

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘राज्यात तीन इंजिनचं सरकार, बिघाडीही होऊ शकते’; राजकीय हालचालींवरुन सत्ताधारी आमदाराचं सूचक विधान

Pune Politics News | मंत्री मंडळ विस्तारावरून भाजप- शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तिढा वाढला; जिल्ह्यातील इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी !

Rohit Pawar on Bharat Gogawale | भरत गोगावलेंच्या वक्तव्यावर आमदार रोहित पवार संतापले, म्हणाले-‘हा आदिती तटकरेंचा अपमान नाही तर…’