Rohit Pawar on Bharat Gogawale | भरत गोगावलेंच्या वक्तव्यावर आमदार रोहित पवार संतापले, म्हणाले-‘हा आदिती तटकरेंचा अपमान नाही तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar on Bharat Gogawale | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी (NCP MLA) मंत्रिपदाची शपथ घेऊन दहा दिवस झाले तरी त्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही. दुसरीकडे भाजप (BJP)-शिवसेनेतील (Shivsena) इच्छूक आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांना अर्थखातं (Finance Minister) आणि आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री (Raigad Guardian Minister) पद देण्यास शिवसेना आमदारांचा तीव्र विरोध आहे. याच दरम्यान अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाबाबत बोलताना भरत गोगावले यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. गोगावले यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. (Rohit Pawar on Bharat Gogawale)

 

 

काय म्हणाले भरत गोगावले?

भरत गोगावले हे बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत विचारण्यात आले. पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांनाही मिळू शकते, असे गोगावले यांना विचारले असता यावर भरत गोगावले यांनी म्हटले की, मग पालकमंत्री म्हणून आम्ही काय वाईट काम करणार आहोत का? आम्ही त्यांच्यापेक्षा (आदिती तटकरे) चांगलं काम करु. महिला (Female) आणि पुरुष (Male) थोडा तर फरक येतो ना, असे गोगावले यांनी म्हटले. मात्र, बोलताना भरत गोगावले यांनी नकळतपणे महिला आणि पुरुष भेदभाव करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. (Rohit Pawar on Bharat Gogawale)

 

काय म्हणाले रोहित पवार?

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विधानाने केवळ ना. आदितीताई तटकरे यांचाच अपमान झाला नाही तर राज्यातील 6 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय. स्री-पुरुष असा भेदभाव करणाऱ्या अधोगामी प्रवृत्तींचा जाहीर निषेध!
मा. पवार साहेबांनी (Sharad Pawar) महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांना विविध क्षेत्रात समान स्थान आणि समान संधी दिली.
याचा नेहमीच अभिमान वाटतो, पण समानतेची शिकवण देणाऱ्या,
संताची भूमी असलेल्या आणि सुसंस्कृत राजकीय परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात महिला लोकप्रतिनिधींविषयी
असं बेताल वक्तव्य करणं कितपत योग्य आहे?, असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

 

 

Web Title :  Rohit Pawar on Bharat Gogawale | maharashtra cabinet expansion
bharat gogawale controversial statement on aditi tatkare

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा