Pune Crime News | पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडून लोणीकंद-केसनंद परिसरात सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोणीकंद पोलिस स्टेशनच्या (Lonikand Police Station) हद्दीत केसनंद (Kesnand) तसेच आसपासच्या परिसरात दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुन्हेगारास पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांनी वर्षभरासाठी पडीपार केले आहेत. (Pune Crime News)

 

सागर कुमार गायकवाड Sagar Kumar Gaikwad (33, रा. अमर चौक, केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) असे तडीपार केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हा केसनंद तसेच आसपासच्या परिसरात दहशत निर्माण करून लोकांना वारंवार त्रास देत होता. त्याच्या दहशतीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता तसेच त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये म्हणून त्याच्यावर कायद्याचा वचक बसावा म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिसांनी त्याला तडीपार करण्याबाबत पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. (Pune Crime News)

 

पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी प्रस्ताव मंजूर केला असून सागर कुमार गायकवाड
याला एक वर्षासाठी पुणे शहर तसेच पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे.

सदरची कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil),
लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत कईंगडे (Sr PI Vishvajeet Kaingade)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी (PSI Ramkrisha Dalvi) ,
पोलिस अंमलदार प्रशांत कापुरे आणि सागर कडु यांच्या पथकाने केली आहे.

जर कोणाला सागर कुमार गायकवाड हा पुणे शहर अथवा जिल्ह्यात आढळून आल्यास नागरिकांनी
त्याबाबत लोणीकंद पोलिस स्टेशनला 9527069100 या क्रमांकावर कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

 

Web Title : Pune Crime News | Deputy Commissioner of Police Shashikant Borate: Criminals in Lonikand-Kesanand
area has been tadipar for one year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा