Pune Crime News | दत्तवाडी पोलिसांकडून मोक्कातील फरारी आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मोक्क्याच्या गुन्हयातील MCOCA (Mokka Action) फरार आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांना दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police Station) अटक केली आहे. राजेंद्रनगरमधील पीएमसी कॉलनीमधून (Rajendra Nagar, PMC Colony) त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटक आरोपींकडून दोन दिवसांपुर्वीचा एक गंभीर गुन्हा देखील उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

आनंद उर्फ सोनु सिध्देश्वर धडे (22, रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे), धनंजय गणेश अडागळे (25, रा. जय गणेश मित्र मंडळाजवळ, तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) आणि प्रसाद उर्फ आप्पा नागेश कराळे (23, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद उर्फ सोनु हा गेल्या वर्षभरापासून फरार होता. दत्तवाडी पोलिस स्टेशनमधील पोलिस हवालदार कुंदन शिंदे, पोलिस प्रशांत शिंदे आणि पोलिस नवनाथ भोसले हे परिसरातील फरारी, रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करीत असताना त्यांना आनंद उर्फ सोनु हा राजेंद्रनगर परिसरातील पीएमसी कॉलनीमध्ये एका बिल्डींगच्या खोलीत लपुन बसल्याची माहिती समजली. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. दत्तवाडी पोलिसांनी 3 पथके तयार करून सापळा रचुन
त्यांना अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी दि. 14 मे 2023 रोजी रात्रीच्या सुमारास
पर्वती परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये स्वप्नील आरणे याच्यावर हत्याराने वार करून त्याला गंभीर दुखापत केली
असल्याचे मान्य केले.

आनंद उर्फ सोनु धडे याच्याविरूध्द सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गंभीर
गुन्हयात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये त्याला जामीन मिळाला होता.
त्यानंतर पुन्हा एका खुनाच्या प्रयत्नाच्या सरकारनगर पोलिस स्टेशनहद्दीत गुन्हयामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई
करण्यात आली होती. तेव्हापासुन तो फरार होता. त्याच्याविरूध्द खुनाच्या प्रयत्नाचे 3, जबरी चोरी, विनयभंग,
तडीपारीचा भंग, दंगलीबाबत सहकारनगर, कोंढवा पोलिस स्टेशन, स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहेत.

अप्पर पोलिस आयुकत प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा
(IPS Suhail Sharma), सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे (Sr PI Jayram Paigude), पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे
(PI Vijay Khomne) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe) , पोलिस हवालदार कुंदन शिंदे, पोलिस नाईक अमित सुर्वे, पोलिस प्रकाश मरगजे,
पोलिस अंमलदार अनिस तांबोळी, पोलिस नवनाथ भोसले, पोलिस प्रशांत शिंदे, पोलिस दिपक लोधा, पोलिस अमोल दबडे, पोलिस दयानंद तेलंगे पाटील, पोलिस बाबासाहेब पाटोळे, पोलिस गोरखनाथ मादगुडे,
पोलिस अमित चिव्हे आणि पोलिस किशोर वळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : Pune Crime News | Duttawadi Police arrested the absconding accused from MCOCA Mokka Action

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole on Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांच्या आरोपांना नाना पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘गैरसमज निर्माण केला जात असेल तर…’

Lok Sabha Election 2024 | राष्ट्रवादीचं मिशन लोकसभा, विभागवार नेत्यांना दिली जबाबदारी; पुणे विभागाची जबाबदारी ‘या’ तरुण नेत्यावर

MLA Sanjay Shirsat | राज्यातील हिंसाचारामागे उद्धव ठाकरेंचा हात आहे का?, एसआयटी मार्फत चौकशी करण्याची शिरसाट यांची मागणी