Pune Crime News | कंपनीत काम करणाऱ्या कामगारांकडून साडे आठ लाखांचा अपहार, चिंचवड एमआयडीसी मधील प्रकार; 5 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पार्सल व रोख रक्कमेत अफरातफर करुन कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी डिलिव्हरी सर्व्हिसेस कंपनीची (Delivery Services Company) 8 लाख 37 हजार 908 रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 4 सप्टेंबर 2022 ते 26 जून 2023 या कालावधीत चिंचवड एमआयडीसी मधील आयडेंटिफाय डिलिव्हरी सर्व्हिसेस (Identify Delivery Services) या कंपनीत घडला. (Pune Crime News)

याबाबत गुडगाव दिल्ली येथील मेन ब्रँचचे झोनल मॅनेजर सुरेंद्र जगदीश शर्मा यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिजनल मॅनेजर विनोद राखे, क्लस्टर मॅनेजर निलेश डांगे, हब इनचार्ज सम्राट ठुबे, डीलेव्हरी बॉय मयूर जिलबेली,ओंकार शिंदे यांच्यास इतर डिलीव्हरी बॉय यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद राखे, निलेश डांगे व सम्राट ठुबे हे आयडेंटिफाय डिलिव्हरी सर्विसेस प्रा. लि. या कंपनीत जबाबदार पदावर काम करतात. या पदाचा गैरवापर करत त्यांनी इतर डिलिव्हरी बॉय यांना हाताशी घेतले. आरोपींनी विश्वासाचा गैरफायदा घेऊन पार्सलचा 5 लाख 77 हजार 177 रुपयांचा व रोख रक्कमेपैकी 2 लाख 60 हजार 731 रुपयांचा असा एकूण 8 लाख 37 हजार 908 रुपयांचा अपहार केल्याचे कंपनीच्या ऑडिटमध्ये दिसून आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार धायगुडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | हवेली क्रमांक 24 चे सहदुय्यम निबंधक निलंबित, 24 कोटी मुद्रांक शुल्क कमी आकारल्याने कारवाई

Pune Police Mcoca Action | मांजरी परिसरात दहशत माजवणाऱ्या अमोल आडेगावकर व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 70 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

MNS Vasant More – MNS Sainath Babar | वसंत मोरेंच्या उमेदवारीसाठी साईनाथ बाबरांची भूमिका महत्वाची ठरणार? शहराध्यक्षांनी स्वत:च्या उमेदवारीबाबत म्हटले…