Pune Crime News | बोहरी आळीतील 3 दुकानातून बनावट खेळणी, शालेय साहित्य जप्त; पावणे तीन लाखांचा माल घेतला ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बोहरी आळीतील (Bohri Ali Pune) तीन दुकानांमध्ये नामवंत कंपन्यांच्या नावाखाली डुप्लिकेट मालाची विक्री केली जात असल्याचे आढळून आले आहे. या दुकानातून डिजनी एंटरप्रायजेस अँड मारवल कॅरेक्टर या कंपनीचे (Disney Enterprises and Marval Character Company) २ लाख ६२ हजार ९१० रुपयांचे टॉईज (Toys) व शालेय साहित्य (School Supplies) जप्त करण्यात आले आहेत. (Pune Crime News)

याबाबत शाहिद हुसेन शहा (वय ३४, रा. नवी दिल्ली) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कैलास डगलारामजी बंजारा Kailas Daglaramji Banjara (रा. प्रगती सोसायटी, गंज पेठ), गिरीश दलिचंद दवे Girish Dalichand Dave (रा. सुनैया होम्स, कात्रज कोंढवा रोड) आणि दिनेश मंगारामजी बंजारा Dinesh Mangaramji Banjara (रा. शुक्रवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डिजनी एंटरप्रायजेस अँड मारवल कॅरेक्टर या कंपनीचे प्रतिनिधी आहेत. शुक्रवार पेठेतील तृप्ती ट्रेडर्स (Trupti Traders) या कैलास बंजारा यांच्या दुकानात ६५ हजार ७२० रुपयांचे डिजनी स्टेशनर सेट (Disney Stationer Set), कार कॉम्पस बॉक्स (Car Compass Box), फ्रोझन पिग्मी बँक (Frozen Pygmy Bank) व इतर बनावट शालेय साहित्याचे ६९५ नग तसेच ३२ हजार ७०० रुपयांचे मारवल साहित्याचे २४७ नग आढळून आले. त्याच्या शेजारील प्रेम टॉईज हाऊसचे (Prem Toys House) गिरी दवे यांचे दुकान व गणेश ट्रेडर्समध्ये (Ganesh Traders) ४३ हजार ५९० रुपयांचे शालेय साहित्याचे ४८५ नग तसेच मारवल कॅरेक्टरचे ३१ हजार रुपयांचे ३२६ नग आढळून आले. त्यांच्यावर कॉपीराईट कायद्यान्वये (Copyright Act) कारवाई करण्यात आली आहे.

Web Title :   Pune Crime News | Fake toys, school supplies seized from 3 shops in Bohri Ali; Goods worth three lakhs were taken into custody

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा दर काय? जाणून घ्या

Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

Pune Crime News | पुणे : ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; मावळमधील कुंडमळ्यातील धक्कादायक घटना

Dr. Pradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरांची पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा; एटीएसच्या दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख