NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Chief Sharad Pawar | गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आता सभा घेण्याच्या तयारीत आहेत. अशात आता शरद पवार यांचे जुने सहकारी आणि विद्यमान भाजप नेते चंद्रराव तावरे (Chandrarao Taware) यांनी मोठा आरोप केला आहे. “शरद पवार यांनी कुटुंबाला कारवाईपासून वाचवण्यासाठी पक्षात फूट पाडण्याचे नाटक केले असल्याचा आरोप तावरे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट नाही तर हे ठरवून केलेले असल्याचा आरोप चंद्रराव तावरे यांनी केला आहे. चंद्रराव तावरे हे 40 वर्षं शरद पवारांसोबत (NCP Chief Sharad Pawar) होते. शरद पवार यांच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचारापासून त्यांनी अनेक निवडणुकात त्यांचा प्रचार केला आहे.

तावरे म्हणाले की, “शरद पवारांनी अनेक वेळा फोडाफोडीचे राजकारण केले आहे. पण आता जे ते करत आहेत ते जाणूनबुजून ठरवून कुटुंबाला वाचवण्यासाठी करत आहे. हे सगळे नाटक हे 2024 विधानसभा निवडणुकीपर्यंत (2024 Assembly Elections) सुरु असणार आहे. तोपर्यंत सगळ्या चौकशीतून क्लीन चिट घ्यायची, असा डाव त्यांचा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे भाजपसोबत (BJP) 90 जागा लढवणार आणि शरद पवार यांच्या जागा एकत्र घेऊन विधानसभेत राष्ट्रवादीचे सरकार आणणार असल्याचे तावरे म्हणाले. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या निवडणुकीवेळी अजित पवार शांत बसून त्यांना मदत करणार असल्याचे तावरे यांनी म्हटले आहे.

Web Title : NCP Chief Sharad Pawar | split in ncp is decided by sharad pawar alleges bjp leader chandrarao taware

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा दर काय? जाणून घ्या

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दरोडेखोरांवर गोळीबार, एक पोलीस जखमी (Video)

Today Horoscope | 8 July Rashifal : मेष आणि मिथुनसह या ३ राशिवाल्यांना मिळू शकते चांगली संधी, वाचा तुमचे दैनिक राशिभविष्य