Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Speaker Rahul Narvekar | शिवसेना शिंदे गटाच्या (Shinde Group) 16 आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला आता वेग आल्याचे दिसत आहे. 16 आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Speaker Rahul Narvekar) लवकरच निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह इतर आमदारांना आजच नोटीस (Notice) दिली जाणार असल्याची शक्यता आहे. (Demand For Disqualification of 16 MLAs)

16 आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे यासाठीची ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे (Speaker Rahul Narvekar) दाखल आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून (Thackeray Group) अनेकदा स्मरण पत्र ही देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. त्यामुळे आता नार्वेकर हे शिंदेंसह इतर आमदारांना नोटीस देऊन या कार्यवाहीची सुरुवात करणार आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर 90 दिवसांच्या विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

याबाबत राहुल नार्वेकर म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Central Election Commission) शिवसेनेच्या घटनेची प्रत आपल्याला मिळाली असून शिंदे यांच्यासह 16 शिवसेना आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी सुरु होणार आहे. नार्वेकर यांनी आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची प्रत मागितली होती. ही प्रत त्यांच्या कार्यालयाला मागील आठवड्यात मिळाली. आता आम्ही सुनावणी सुरु करु, असे नार्वेकर म्हणाले. ही प्रक्रिया प्रत्यक्षात कधी सुरु होणार, असे विचारले असता नार्वेकर यांनी ‘लवकरच’ असे उत्तर दिले होते. त्यांच्या या विधानानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 16 आमदार अपात्र होणार की नाही, हे पहावे लागेल.

Web Title :  Speaker Rahul Narvekar | vidhan sabha assembly speaker will soon take a decision on the suspension of 16 mlas of the shinde group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा दर काय? जाणून घ्या

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दरोडेखोरांवर गोळीबार, एक पोलीस जखमी (Video)

Today Horoscope | 8 July Rashifal : मेष आणि मिथुनसह या ३ राशिवाल्यांना मिळू शकते चांगली संधी, वाचा तुमचे दैनिक राशिभविष्य