Pune Crime News | येरवडा कारागृहात गुंडांच्या टोळ्यांमध्ये धुम्मचक्री; 16 कैद्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वर्चस्ववादातून रोडवर राडा घालणार्‍या टोळक्यांनी येरवडा कारागृहातही (Yerwada Jail) एकमेकांवर दगड, पत्याचा तुकडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन जखमी केले. (Pune Crime News)

 

प्रकाश शांताराम येवले (Prakash Shantaram Yewle), विजय चंद्रकांत विरकर (Vijay Chandrakant Virkar), सचिन शंकर दळवी (Sachin Shankar Dalvi), मुकेश सुनिल साळुंखे (Mukesh Sunil Salunkhe), गणेश वाघमारे (Ganesh Waghmare), आदित्य नानाजी चौधरी (Aditya Nanaji Chaudhary), किरण रमेश गालफाडे (Kiran Ramesh Galphade), आकाश उत्तम शिनगारे (Akash Uttam Shingare), विशाल रामधन खरात (Vishal Ramdhan Kharat), रुपेश प्रकाश आखाडे (Rupesh Prakash Akhade), रोहित चंद्रकांत जुजगर (Rohit Chandrakant Jujgar), शुभम गणपती राठोड (Shubham Ganpati Rathod), अनुराग परशुराम कांबळे (Anurag Parashuram Kamble), मेहबुब फरिद शेख (Mehbub Farid Shaikh) अशी गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत. रावण गँग (Ravan Gang Pune), चिखली (Chikhali), वारजे रामनगर (Ramnagar Warje) अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या टोळ्यांमधील हे कैदी आहेत.

 

ही हाणामारी येरवडा कारगृहातील सर्कल ३ परिसरातील बरॅक ८ मध्ये सोमवारी सकाळी १० ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime News)

 

याबाबत तुरुंगाधिकारी हेमंत गोविंदराव इंगोले (Prison Officer Hemant Govindrao Ingole) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४१७/२३) दिली आहे. येरवडा कारागृहातील कैद्यांची क्षमता अडीच हजार आहे. असे असताना त्याच्या तीन पट कैदी सध्या येथे ठेवण्यात आले आहेत. त्यात न्यायालयीन कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे एकेका बरॅकीत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी असल्याने त्यांच्यात वेगवेगळ्या कारणावरुन कुरबुरी सुरु असतात.

त्यातून या कैद्यांनी सोमवारी सकाळी आपसात एकमेकांना दगड, पत्याचा तुकडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यात काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Fighting In Gangs In Yerawada Jail; A case has been filed against 16 prisoners

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfers | 14 Police Inspectors transferred in Pune; They include senior PIs of Swargate,
Mundhwa, Khadki, Alankar, Warje Malwadi, Uttam Nagar, Khadak and Koregaon Park police stations

ACB Trap News | Police constable walks into ACB net while accepting Rs 12,000 bribe

Pune PMC Property Tax | Property owners to get 5-10% rebate on general tax; PMC announces lottery scheme