
Pune Crime News | पार्किंगमध्ये तरुणीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग, चार जणांवर FIR; कोंढवा परिसरातील घटना
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकी (Threat) देऊन तरुणीचा विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार मोहम्मदवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी (Pune Crime News) चार जणांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास पीडित तरुणी राहत असलेल्या घराच्या पार्किंगमध्ये घडला आहे.
याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश वरकुल (Rakesh Varkul), विनायक मिराजकर (Vinayak Mirajkar), सुरेखा मिराजकर (Surekha Mirajkar), शुक्रा मिराजकर (Shukra Mirajkar) यांच्यावर आयपीसी 354, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने आरोपींविरोधात तक्रार दिली आहे.
यावरुन आरोपींनी तरुणीला तक्रार मागे घे असे म्हणून धमकी दिली.
घटनेच्या दिवशी तरुणी कामावरुन आल्यानंतर घराच्या पार्किंगमध्ये गाडी लावण्यासाठी गेली.
त्यावेळी आरोपी राकेश वरकुल तिच्या जवळ आला.
त्याने तरुणीची गाडी लावून देण्याच्या बहाण्याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करुन विनयभंग केला,
असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Post Office | पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटचे आता नवीन नियम, काय-काय बदलले, जाणून घ्या
25 August Rashifal : मेष आणि मिथुनसह या तीन राशीवाल्यांसाठी दिवस आहे खास, वाचा दैनिक भविष्य