Pune Crime News | मानसिक व शारिरीक त्रास देणाऱ्या पतीसह सासरच्या लोकांवर FIR, मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दिराच्या लग्नात दिलेले दागिने (Jewelry) परत मागिल्याच्या कारणावरुन विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करुन तिला घराबाहेर काढले. तसेच तिच्या पतीने लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud Case) करुन बघुन घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्या लोकांवर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) जानेवारी 2021 ते 22 जुलै 2023 दरम्यान घडला.

महिलेच्या (वय-34) तक्रारीवरुन वानवडी पोलिसांनी पती ज्ञानेश माधवराव नरहरे, सासू माधवी माधवराव नरहरे आणि नणंद ज्ञानेश्वरी माधवराव नरहरे (तिघे रा. वडगाव शेरी) यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेचे व तिच्या पतीचे पहिले लग्न झालेले आहे. महिला व तिचे पती 2018 पासून एकमेकांना ओळखत असल्याने त्यांनी लग्न केले. पतीवर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याने महिलेच्या आईने मदत म्हणून पतीला 10 लाख रुपये दिले होते. (Pune Crime News)

तसेच हॉटेल व्यवसाय (Hotel Business) सुरु करण्यासाठी 30 लाख रुपये दिले होते. तर एफ.सी. रोडवर (F.C. Road) बिअर बार (Beer Bar) चालु करण्यासाठी पैसे दिले. दरम्यान, पतीने पत्नीला तीची बीएमडब्ल्यू कार (BMW Car) विकून महिंद्रा थार (Mahindra Thar) गाडी घेण्यास लावून त्याचे हप्ते महिलेच्या कंपनीच्या खात्यातून भरले जात आहेत. याशिवाय पतीने त्याच्या वडिलांना देखील कार घेऊन दिली. त्याचे देखील हप्ते महिलेच्या कंपनीच्या बँक खात्यातून जात आहेत. दरम्यान, दिराच्या लग्नावेळी महिलेने 5 लाख रुपयांचे दागिने दिले होते.

दिराच्या लग्नात दिलेले दागिने परत मागितले असता महिलेच्या सासूने व नंणंद यांनी शिविगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली.
याबाबत पतीला सांगितले असता पतीने दारु पिऊन महिलेला मारहाण केली. महिला पतीच्या घरी गेली गेली होती.
त्यावेळी पतीची पहिली पत्नी त्याठिकाणी होती.
याबाबत विचारणा केली असता सासूने आणि नणंद यांनी महिलेला घरातून हाकलून दिले.
आरोपी पती, सासू आणि नणंद यांनी दागिने पैसे घेऊन महिलेची फसवणूक करून तिला मानसिक व शारिरीक त्रास
दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | रिक्षामध्ये विसरलेली 2 लाख रुपयांची दागिन्यांची बॅग पोलिसांमुळे मिळाली परत