Pune Crime News | धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या तिघांवर FIR, एकाला अटक; चिंचवडमधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | धोकादायकपणे भरलेल्या सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या एकाला अटक करुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Police) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मंगळवारी (दि.7) दुपारी साडेतीन वाजता सदगुरू गॅस सेल्स अँड सर्विसेस (Sadguru Gas Sales & Services), चिंचवड येथे केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस नाईक गणेश सिताराम कारोटे (वय-37) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार नंदु लक्ष्मण सुर्यवंशी (वय-19 रा. सायली कॉम्पलेक्स, दत्त मंदिरासमोर, चिंचवड) याला अटक केली आहे. तर गणेश वाल्हेकर (वय-40 रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), प्रमोद नागोरे (वय-40 रा. चिंचवड) यांच्यावर आयपीसी 420, 285, 34 सह जिवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदु सुर्यवंशी धोकादायकरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून लहान वापराच्या सिलेंडरमध्ये गॅस भरत होता. लोकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका होऊ शकतो हे माहित असताना देखील गॅस रिफिलिंग करत होता. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला माहिती मिळताच पथकाने सदगुरू गॅस सेल्स अँड सर्विसेस, चिंचवड येथे छापा टाकला. (Pune Crime News)

आरोपी बेकायदेशिररित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या लहान रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग
(Gas Refilling) करुन ग्राहकांची व शासनाची फसवणूक (Cheating Fraud Case) करत असल्याचे आढळून आले.
नंदु सुर्यवंशी याच्याकडे केलेल्या चौकशीत गॅस विक्रीचा व रिफिलिंगचा कोणताही शासकीय परवाना नसल्याचे समोर आले.
आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याला गणेश वाल्हेकर व प्रमोद नागोरे याने गॅस रिफिलिंग करता गॅस सिलेंडर
टाक्या उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tamannaah Bhatia Killer Photo | तमन्ना भाटीयानं ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये इंटरनेटचा वाढवला पारा, पाहा व्हायरल फोटो

Namrata Malla Bralette Photo | भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाचे हॉट लूक पाहून तुम्हीही व्हाल घायाळ..